You are currently viewing नगरसेवक शिशिर परुळेकर यांना मातृशोक

नगरसेवक शिशिर परुळेकर यांना मातृशोक

कणकवली
कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक शिशिर सुभाष परुळेकर यांच्या आई शोभा सुभाष परुळेकर (65) यांचे रविवारी पहाटेच्या 2 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी पहाटे त्यांना त्रास जाणवू लागल्याने येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणले जात होते. तत्पूर्वीच यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जुन्या काळातील जेष्ठ व्यापारी सुभाष परुळेकर यांच्या त्या पत्नी होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + three =