You are currently viewing मीरा भाईंदर मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आले ९ प्रवासी 

मीरा भाईंदर मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आले ९ प्रवासी 

९ प्रवाशांसोबत त्यांच्या संपर्कातील कुटुंबियांचेही अहवाल निगेटिव्ह

 

मुंबई :

अँकर- मीरा भाईंदर मध्ये नुकत्याच दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ९ प्रवाशांना शोधून त्यांची  कोविड चाचणी करण्यात महापलिकेच्या आरोग्य पथकाला यश आले आहे. आफिकेतून आलेले हे प्रवासी मीरा भाईंदर मध्ये वेगवेगळ्या परिसरात राहणारे आहेत. महापालिकेने त्यांची निवासस्थळ शोधत प्रवासी व त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबियांची  RT-PCR  तपासणी केली आहे . या सर्वांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती पालिकेने एका प्रसिद्धी पत्रकातून जारी केली आहे. या प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी शासनाच्या निर्देशानुसार संबंधित ९ प्रवाशांना विलगिकरन कक्षात ठेवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा