You are currently viewing पिंपरी चिंचवडचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साहित्यिक श्री.नंदकुमार मुरडे ७५ व्या वर्षात पदार्पण

पिंपरी चिंचवडचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साहित्यिक श्री.नंदकुमार मुरडे ७५ व्या वर्षात पदार्पण

पुणे :

*”शब्दसाधक”*

आदरणीय श्री. नंदकुमार मुरडे सर, कवी, लेखक, गझलकार, कथाकार, कथाकथनकार, अभिनेते, संपादक, व्याख्याते, निष्ठावंत कार्यकर्ते, अशी जनमानसात आपली ओळख आहे. आपण उत्तम साहित्यिक तर आहातच पण अजातशत्रू, विनयशील, मोठ्यांचा आदर, लहानांना प्रेम देणारे, दमदार आवाज असलेले, एक आनंदी आणि उत्साही असे सुहृदयी व्यक्ती आहात.

‘आनंद’ मधील ‘नंद’ हा शब्द आपल्या नावातच आहे. आपल्या नावाप्रमाणेच आपले शब्दही उल्हास आणि उन्मेषाने बहरलेले असतात. आपली कल्पनाशक्ती असीम आहे. आपल्याकडे शब्द संपदेचे भांडार आहे. आपल्या कथा, कविता, लेख, गझला मनाला मोहून टाकतात व थेट काळजापर्यंत पोहोचतात. आपण शब्दांचे पुजारी असून, मनोभावे शब्दांची आराधना करत आहात. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने ‘शब्दसाधक’ आहात.

आदरणीय मुरडे सर, आपण साहित्य क्षेत्रात अशीच उंच भरारी घ्यावी आणि ध्रुवताऱ्यासारखे आपले स्थान अढळ करावे, अश्या आपल्या 75 व्या वाढदिवसा निमित्ताने, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड पुणे च्या वतीने आपणास हृदयापासून शुभेच्छा. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

 

समस्त स्वयंसिद्धा प्रतिष्ठान परिवार.

लेखांकन-सविता इंगळे (संस्थापक अध्यक्ष)

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =