उद्या दि.१८जानेवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै यांची ५१वी पुण्यतिथी व बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी साडेदहाला कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमात बॅरिस्टर नाथ पै स्मृती जिल्हास्तरीय खुल्या गट वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे आणि नाथ पै यांचे बेळगाव येथील सहकारी बेळगाव महाराष्ट्र सीमा एकिकरण चळवळीतील एक महान व्यक्तित्व ,स्वातंत्र्य सैनिक,नाथ पै यांचे सहकारी श्री विठ्ठल याळगी, बॅरिस्टर नाथ पै यांची नात अदिती पै यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन वजा चर्चा सत्र असणार आहे . कार्यक्रमात समाजवादी ज्येष्ठ नेत्या कमलताई परुळेकर, जयप्रकाश चमणकर व नाथ पै यांच्यावर श्रद्धा असलेले विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर त्यांच्या सहकार्यांनी केले आहे.
उद्या १८ जानेवारी रोजी बॅ. नाथ पै यांची ५१वी पुण्यतिथी व बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
- Post published:जानेवारी 17, 2022
- Post category:कुडाळ / बातम्या / विशेष / शैक्षणिक
- Post comments:0 Comments
You Might Also Like
नंदकुमार मुरडे लोकमान्य टिळक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कामकाज पाहून भारावले जी-२० शिष्टमंडळ
शिवसेना वर्धापनदिनानिमित्त सावंतवाडीत कोविड रुग्णाना सँनिटायझर, एनर्जी पावडरचे वाटप
