You are currently viewing गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रत्नागिरीत दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रत्नागिरीत दाखल

रत्नागिरी :

 

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे कोकण लोकसभा प्रभारी प्रमोद सावंत यांचे शुक्रवारी पहाटे रत्नागिरीत आगमन झाले असून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ते उपस्थित राहणार आहेत.

गुरुवारी सकाळी भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या नावाची घोषणा केली आणि भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकच जल्लोष केला. सगळीकडून उत्साही प्रतिक्रिया उमटल्या. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता ना. राणे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यावेळी त्यांच्या समवेत यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, शिवसेना नेते पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे, शिवसेना नेते किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निवडणूक समन्वयक अजित यशवंतराव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, आरपीआय, रासप, रयत क्रांती या पक्षाचे महत्वाचे नेते पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यावेळी उपस्थित राहणर आहेत. याचसाठी प्रमोद सावंत शुक्रवारी सकाळी कोकण रेल्वे ने रत्नागिरीत दाखल झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा