विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत सांगीतिक मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
पिंपरी
प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ या श्रवणीय आणि सुमधुर हिंदी – मराठी चित्रपट गीतांच्या बहारदार सांगीतिक मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, सुचिता शेटे, ॲड. स्मिता शेटे, उषा शेटे, पिंपरी – चिंचवड शिवसेना (शिंदे गट) प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, नेहा चौधरी, मुकेश चौधरी, विलास गाधडे, मोहन भस्मे, विकास जगताप, पांडुरंग म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वंदना पगारे यांचे अभीष्टचिंतन चिंतन करण्यात आले. तसेच पीथमपूर बॉम्बे या कंपनीने लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जागतिक दर्जाच्या नेल्सन ग्लोबल कंपनीकडून प्राप्त झालेल्या विशेष पुरस्काराप्रीत्यर्थ स्मिता विजयन, सचिन शेटे, प्रदीप अमोलू आणि विंशा अमोलू यांना विविध भारती म्युझिकल इव्हेंट समूहाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून त्यांना
श्रद्धांजली अर्पण करीत प्रारंभ करण्यात आलेल्या ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ या सांगीतिक मैफलीत नंदकुमार कांबळे, विनायक कदम, राजेंद्र पगारे, शुभांगी पवार, नेहा दंडवते, पंकज कथलकर, सूर्यकांत ताम्हाणे, सुहासिनी कंझरकर, पूनम झांबरे, डॉ. कविता बोंडे, संजय पाटील, विलास खरे, अजय सोलंकी, सतीश कापडी आणि सुनील जोशी या गायक कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजात हिंदी व मराठी गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. रसिक श्रोत्यांनी प्रत्येक गीताला उत्स्फूर्त दाद देत अनेक गाण्यांना ‘वन्स मोअर’ची मागणी केली.
‘रहे न रहे हम’ , ’आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ , ‘तुमसे हो हसीना कभी मोहब्बत जो मैंने कर ली थी’ , ‘जीना क्या अजी प्यार बिना’ , ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ , ‘तुने ओ रंगीले कैसे जादू किया’ यांसारख्या गाजलेल्या गीतांसोबतच सादर करण्यात आलेल्या मराठी गीतांनाही श्रोत्यांकडून दाद मिळाली.
‘हैं अपना दिल तो आवारा’ हे गाणे विलास खरे यांनी माऊथ ऑर्गनवर सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
दृकश्राव्य कराओके गीतांच्या या विनाशुल्क मैफलीचे ध्वनिसंयोजन राजेंद्र देसाई यांनी केले; तर विक्रम अंबिके यांनी दृकश्राव्यचित्रण केले. नेहा दंडवते आणि शुभांगी पवार यांनी खुसखुशीत शैलीतून निवेदन केले. विनायक कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
-प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
