You are currently viewing जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त १९ जुलैला विशेष बुद्धिबळ स्पर्धा; कणकवली व कुडाळ येथे रंगणार सामने

जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त १९ जुलैला विशेष बुद्धिबळ स्पर्धा; कणकवली व कुडाळ येथे रंगणार सामने

श्री चेस अकॅडमी, कणकवली व नवजीवन चेस अकॅडमी, सावंतवाडीचा संयुक्त उपक्रम; १७ जुलैपर्यंत नोंदणी, प्रवेश फी ₹१००

कणकवली :

श्री चेस अकॅडमी, कणकवली आणि नवजीवन चेस अकॅडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त विशेष बुद्धिबळ स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलै जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त ही स्पर्धा १९ जुलै २०२६ (रविवार) रोजी अकॅडमिक स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी दोन केंद्रांची निवड करण्यात आली आहे. केंद्र क्र. १ – श्री चेस अकॅडमी, शिवाजीनगर, कणकवली येथे सकाळी ९.०० ते १२.३० या वेळेत स्पर्धा होईल. तर केंद्र क्र. २ – प्राथमिक शाळा MIDC, रेस्ट हाऊसजवळ, कुडाळ येथे सायंकाळी ३.०० ते ६.०० या वेळेत सामने खेळविण्यात येतील. प्रत्येक खेळाडूला कोणत्याही एका केंद्रावरच खेळता येणार आहे.

स्पर्धा दोन गटांत होणार असून गट-अ मध्ये इयत्ता १ ली ते ५ वी, तर गट-ब मध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

स्पर्धेची प्रवेश फी ₹१०० असून ती फक्त GPay द्वारे ९४२२३८१९४९ या क्रमांकावर भरायची आहे. नोंदणीसाठी WhatsApp वर खेळाडूचे नाव, इयत्ता आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठविणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख १७ जुलै २०२६ असून प्रत्येक केंद्रावर केवळ ५० खेळाडूंनाच प्रवेश दिला जाणार आहे.

विजेत्यांना आकर्षक पदकांनी गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक गटात पहिल्या ते पाचव्या क्रमांकापर्यंत गोल्ड मेडल, सहाव्या ते दहाव्या क्रमांकापर्यंत सिल्व्हर मेडल, तर त्यानंतरच्या सर्व सहभागी खेळाडूंना ब्राँझ मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धा Swiss League पद्धतीने होणार असून FIDE नियमांनुसार सामने खेळविण्यात येतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळेत शिकणारे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आडेलकर सर – ९४२२३८१९४९ आणि म्हापसेकर सर – ९९७५४८२९०३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा