You are currently viewing भक्तीचा भुकेला पांडुरंग

भक्तीचा भुकेला पांडुरंग

*भक्तीचा भुकेला पांडुरंग*

वेडा रे हा भक्त ! तुझिया नामाचा !!
भुकेला भक्तीचा ! पांडुरंग !!

मुखी तुझे नाम ! टाळ वीणा हाती !!
अभंगची गाती ! भक्तिमार्गे !!

आषाढी कार्तिकी ! जन गोळा होती !!
अभंग गाजती ! विठोबाचे !!

राम कृष्ण हरी ! विठू नाम घेई !!
जयघोष होई ! पंढरीत !!

वैष्णव ते दंग ! विठ्ठल नामात !!
रंगे गुलालात ! वारकरी !!

चंदनाची उटी ! दोन्ही कर कटी !!
पुंडलिक भेटी ! माऊलीये !!

दाही दिशा गर्जे ! पंढरीची किर्ती !!
विठ्ठलाची मूर्ती ! विटेवरी !!

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 15 =