You are currently viewing तुझ्या नादात मी

तुझ्या नादात मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

*तुझ्या नादात मी*
*************
*तुझ्या नादात मी*
*विसरून जातो घर माझे*
*घर शोधू की तुला शोधू*
*काय करू मी कळत नाही.*

*एक वाट घरा कडे आणि*
*एक वाट तुझ्या कडे येते*
*अशा चौकात उभा मी*
*घराकडे जाऊ की तुझ्याकडे येऊ*
*काय करू मी कळत नाही*

*सोडू शकत नाही*
*घरालाही आणि तुलाही*
*बंद घराचे दार*
*मी उघडायचे की*
*तुला घेऊन जाऊ*
*काय करू मी कळत नाही*

*राहू शकत नाही मी*
*तुझ्याशिवाय*
*आणि जाऊही शकत नाही*
*घेऊन तुला कुठे*
*तुझ्या सोबत राहू की*
*तुला सोडून देऊ*
*काय करू मी कळत नाही*

*कशाला त्रास करून घेतेस तू*
*स्वप्नात येऊन माझ्या*
*स्वप्नातून जागे होऊ की*
*तुझ्या स्वप्नातच राहू*
*काय करु मी कळत नाही*

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =