You are currently viewing वेदना

वेदना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… महाराष्ट्र रणरागिणी साहित्य कुंज समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री किरण (करामोरे) चौधरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*शीर्षक-वेदना*
*मुक्तछंद*

*गर्मी गर्मी म्हणता म्हणता*
*असा मोहक पाऊस आला*
*हिरवळ वन सजण्याआधी,सौंदर्य मुरवून गेला*
*उन्हात तहान कधी भागली नाही*
*पावसाळ्यात तहान कधी लागली नाही*
*सुकलेल्या जंगलाला ओलावा जरा हवा होता*
*दरड कोसल्याशिवाय त्याचे मन कधी मानले नाही*
*धरा कोरडी धूळ धूळ पडलेली*
*असा बरसला,ओली माती वाहुनी आता,रेताळ दिसू लागली*
*सजले होते टाटव्यांनी घरे राहती*
*रोद्र रूप पाहुनी, लिपन जागा सोडू लागली*
*संथ होते, निर्मळ जल सरितेचे*
*त्यात हालचाल अचानक तेज होऊ लागली*
*असा वेग वाढला पाऊसाचा*
*नदी उफानावर वाहू लागली*
*कुठे लोपली?गावे दिसे ना*
*ओसाड धरा,जलथल झाली*
*वेदना त्या शब्दात कधी न रेखाटता आल्या*
*पाऊस येता!दरवर्षी त्याने कुठली तरी नवी कहाणी लिहली*
*कहाणी लिहली*

*किरण चौधरी*
*गडचिरोली*

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − eleven =