You are currently viewing तेच ते…

तेच ते…

(जेष्ठ साहित्यिक विं.दां.ची माफी मागून)
गेल्या दीड वर्षापासून..
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते…
त्याच बातम्या,तोच मजकूर..
तेच चेहरे..तेच राजकारण…
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते…
तेच आकडे…तीच अगतिकता…
तोच गोंधळ..तेच गोंधळी..
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते…
तोच श्रेयवाद.. त्याच पत्रकार परिषदा…त्याच पोकळ घोषणा…तेच सत्तेचं राजकारण…।
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते….
तेच मदतीचे फोटो..त्याच बातम्या.. तेच वादविवाद..तेच आरोप-प्रत्यारोप…
तीच बेडची धडपड..आँक्सीजनची परवड….व्हेंटिलेटरची शोधाशोध…
सकाळ पासून रात्रीपर्यंत तेच ते…तेच ते…
तीच लुटण्याची संधी…
तोच आक्रोश..तोच प्रेतांचा खच…त्याच प्रियजना़च्या आर्त किंकाळ्या…आणि तोच काळीज पिळवटणारा आवाज…
तोच औषधांचा काळाबाजार…
तोच समाजकंटकांचा हैदोस…
तोच राजकारण्यांचा तमाशा…
तेच मदतीचे फोटो..आणि तेच किळसवाणं प्रदर्शन…
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते…तेच ते…
अँड.नकुल पार्सेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − one =