You are currently viewing चिंदर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत जाहीर; प्रभाग २ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षित

चिंदर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत जाहीर; प्रभाग २ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षित

चिंदर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत जाहीर; प्रभाग २ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षित

ग्रामसभेत सर्वानुमते मंजुरी; ११ सदस्यांपैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

मालवण :

चिंदर ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. १२ जून) चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या ग्रामसभेत जाहीर करण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा पंचायत समिती मालवणचे विस्तार अधिकारी आत्माराम परब यांनी ग्रामपंचायत प्रशासक स्वरा पालकर व ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षणाची घोषणा केली.
चक्रानुक्रमे फिरणाऱ्या आरक्षण प्रक्रियेनुसार नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणासाठी प्रभाग क्रमांक १ व २ यांच्यात चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. या सोडतीत प्रभाग क्रमांक २ हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला. विशेष म्हणजे, प्रभागनिहाय आरक्षणाबाबत कोणताही आक्षेप नोंदविण्यात आला नसून ग्रामसभेने ते सर्वानुमते मंजूर केले.
प्रभाग रचना अशी
प्रभाग क्रमांक १ : सडेवाडी, तेरई, भगवंतगड, लब्देवाडी
प्रभाग क्रमांक २ : भटवाडी, देऊळवाडी, कुंभारवाडी
प्रभाग क्रमांक ३ : चिंदर बाजार, अपराज कोंडवाडी, नागोचीवाडी, खरीवाडी, पडेकाप, बागवाडी
प्रभाग क्रमांक ४ : गावठणवाडी, गावडेवाडी, पालकरवाडी, पाटणवाडी, साटमवाडी
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक १ :
सर्वसाधारण
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक २ :
सर्वसाधारण
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ३ :
सर्वसाधारण
सर्वसाधारण महिला
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
प्रभाग क्रमांक ४ :
सर्वसाधारण
सर्वसाधारण महिला
सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असून ग्रामपंचायतीत एकूण ११ सदस्यसंख्या राहणार आहे. त्यामध्ये ४ सर्वसाधारण, ५ सर्वसाधारण महिला, १ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि १ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अशी आरक्षण रचना निश्चित करण्यात आली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील विविध मान्यवर, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत आरक्षण प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त करत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा