सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा नियम चर्चेचा विषय..

सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा नियम चर्चेचा विषय..

अवघ्या महिनाभरापूर्वी केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेला सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा नियम सध्या चर्चेचा विषय आहे. या नियमाची देशभरात पूर्णपणे अंमलबजावणी झाली नसतानाच हा नियमच रद्द झाल्याची चर्चा सुरु झाली होती. यासंदर्भात केंद्र सरकारने नवा आदेशही काढल्याचे सांगितले जात होते. मात्र, असा कोणताही आदेश काढण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण केंद्राकडून देण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच हॉलमार्किंगच्या नियमांबाबत पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा निर्णय लागू होऊनही भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) संकेतस्थळावरच याची पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्योग संघटनांनी केंद्रीय उपभोक्ता मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहले होते. 15 जूनला केंद्र सरकार आणि व्यापाऱ्यांची एक बैठक झाली होती. मात्र, त्यानंतरही भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या संकेतस्थळावर किंवा इंटरनेटवर सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून FAQ या बदलांची तितकीशी माहिती मिळत नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये हॉलमार्किंगच्या नियमाविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा