You are currently viewing सुट्टीतला बेस्ट फ्रेंड- पुस्तक

सुट्टीतला बेस्ट फ्रेंड- पुस्तक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी अरुण वी. देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*सुट्टीतला बेस्ट फ्रेंड- पुस्तक*

————————

बालमित्रांनो,

परीक्षा संपल्यावर, तुमचे सुट्टीच्या प्लॅनसला सुरुवात झाली असेल. दरवर्षी येणार उन्हाळा जास्तच कडक उन्हाचा होतो आहे. या उष्णतेचा त्रास लहान-मोठ्या सर्वांना होतो.

या दिवसात बाहेर पडू नका, उन्हात फिरू नका, उन्हाचा फटका बसला ना, तर तुमच्या सुट्टीच्या आनंदावर पाणी पडेल हे लक्षात असू द्या.

अशा वेळी घरच्या बाहेर न पडणे ” , उन्हात फिरणे टाळणे”हाच उत्तम उपाय आहे.

 

तुम्ही म्हणाल, सुट्टीच्या दिवसात घरातच बसून राहायचे ?

आम्हाला कंटाळा नाही का येणार ?

 

मित्रांनो- तुमचे बरोबरच आहे. टीव्ही पहाणे, मोबाईल गेम खेळुन खेळून कंटाळा येतो” हे तुम्ही कबूल कराल कारण सुट्टीचे दिवस, तुम्हाला अभ्यासातून सुटका मिळाली आहे,

मग काय मोबाईल आणि तुम्ही, कोणी बोलणार नाही.

म्हणूनच तुम्हाला बोअर होणार.

 

यावर बेस्ट उपाय सुचवतो मित्रांनो, तुम्ही लायब्ररी मेम्बर होऊन जा, आणि पुस्तकांच्या खजिन्यातून तुम्हाला आवडणारी पुस्तके आणून रोज एक पुस्तक पूर्ण वाचून काढा.

इंग्लिश, हिंदी, मराठी ” भाषा कोणती ? विचार नका करू.

लायब्ररीत गेल्यावर एकेक रॅक मधून स्वतःच्या हाताने पुस्तकं पहा, चाळा, आणि जे आवडेल ते पुस्तक घरी घेऊन या.

बाल-कुमार वयोगटातील वाचकांसाठी मोठ्या प्रमाणात बालसाहित्याची पुस्तके वाचनालयात असतात.

मनोरंजन करणाऱ्या करमणूक कथा, अद्भुतरम्य फॅन्टसी,

विज्ञानाच्या कुतूहल कथा, आणि नोव्हेल, कादंबरी,

या प्रकारचे साहित्य पुस्तकरूपात आहे.

 

हैरी पॉटर वाचा, बोक्या सातबंडे वाचा, जुन्या काळातले आज ही वाचकप्रिय असणारी पुस्तके- श्यामची आई, गोट्या, फास्टर फेणे, वाचा, तसेच आजची प्रसिद्ध पुस्तके वाचा.

पुस्तक नावाचा मित्र खूप गप्पीष्ट आहे, तो कॉमिक्स स्टोरीज सांगतो, आपल्या जगाबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो, विज्ञानाच्या शोधक कथा सांगतो,

अलिबाबाच्या गोष्टी, सिंदबादच्या सफरी, फिरवून आणतो.

जंगल बुक ” मधल्या बगिरा, शेरखान आणि मोगलीशी

भेट घालून करतो.

कवितेतून निसर्गचा फेरफटका होतो, गावाकडच्या गोष्टी

नव्याने भेटतात.

 

आजच्या डिजिटल तंत्राने प्रकाशित होणारे बालसाहित्य

खूप आकर्षक आणि देखण्या सजावटीचे आहे. ही पुस्तके पाहण्याचा, वाचण्याचा आनंद तुम्ही या सुट्टीत अनुभवलाच पाहिजे.

तुम्ही काय काय वाचले ते नक्की कळवा बरं का !

————————————–

लेख- सुट्टीतला बेस्ट फ्रेंड- पुस्तक

लेखक-अरुण वि.देशपांडे -पुणे

9850177342

—————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा