You are currently viewing हर्ष भरून रहावा

हर्ष भरून रहावा

लालित्य नक्षत्रवेल समूह प्रमुख, जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी श्रीकांत दीक्षित यांची भावस्पर्शी कथा

“राधा सप्रे…”
तिचं नाव ऐकताच तिने चमकून पाहिले. खरं तर ती एवढी विचारात गुरफटून गेली होती. स्वतःबद्दल विचार करताना, राधा सतत आपल्या नशिबाला दोष देत असे… तिचे कुरूप असणारे रूपडे पाहून सहसा तिच्याकडे कोणी आकर्षित होत नसे. पण तरीही देवाचे मानावे तेव्हढे आभार कमीच.. तिच्या आवाजाचा गोडवा ही एक दैवी देणगी होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच. तिने आपली संगीतातील पदवी घेतली होती.
आता आपल्या कुटूंबाची जबाबदारी तिच्यावरच होती. वृद्ध आईवडिलांचा भार तिलाच वहायचा होता. आता शिक्षणानंतर नोकरी..
अनेक ठिकाणी प्रयत्न केला. शेवटी सर्वांनी सांगितले जर तू मुंबईला गेली तर तुला नोकरी लागू शकते.

आज त्याच आशेवर मुलाखतीच्या रांगेत बसलेली होती. आपले नाव ऐकताच चटकन उठून केबिन कडे चालू लागली..

“May I Come in Sir..?”

तिने दरवाजातून आत जाताच परवानगी मागितली.

“या या राधाजी आपले स्वागत आहे.” असं म्हणत कन्हैयाने तिला बसण्यास परवानगी दिली. समोरची व्यक्ती पाहताच तीला अश्चर्याचा धक्का बसला. कारण समोर असणारी व्यक्ती व तिची ओळख नुकतीच काल प्रवासात झाली होती.
पुण्यावरून निघताना स्टेशनवर आई सोडायला आली होती. “राधा काळजी घे. उद्याची मुलाखत देताना आजिबात काळजी करू नकोस..”

“हो आई, चल निघते.. गाडी सुटायची वेळ झाली.” असं म्हणत ती डब्यात चढली. तशी डब्यात थोडी गर्दी होती..पण तिला बसायला ऐसपैस जागा मिळाली. तिच्या समोर एक देखणा रूबाबदार तरूण बसला होता. तिला संकोचल्यासारखे झाले. तो डोळे मिटून आरामशीर टेकून बसला होता. त्याने डोळे उघडून पाहिले तर.. आपले असलं रूप पाहून काय वाटेल. पण बराच वेळ त्याने डोळे उघडले नाहीत. तिला शंका आली..हा हालचाल तर करतोय मग डोळे बंद का?..
आता तीला उद्याच्या मुलाखतीचे टेन्शन होते. डब्यात बरीच शांतता होती. तिच्या डोक्यात उद्या म्हणायचे गाणे घोळत होते.

ये तेरा घर ये मेरा घर

या गाण्याचे बोल व तिचा मंजूळ आवाज ऐकताच त्याने देखील पुढील दोन ओळी म्हटल्या…

ना बदलोंकी गांव मे,  ना चांदणी की छाव मे
ना फुल जैसे रस्ते बने है इसके वास्ते…

पुढील दोन ओळी व त्याचा आवाज ऐकून ती एकदम चाट पडली. मग एकमेकांच्या ओळखी व गप्पा रंगल्या. खरं तर कन्हैय्या हा जन्मांध होता. पण उच्च शिक्षित होता.

स्टेशनवर उतरल्यानंतर त्याने आपले व्हिजिटिंग कार्ड तिला दिले. ते वाचताच ती भानावर आली. आपण ज्या म्युझिक कंपनीत मुलाखतीला जातोय तेथील डायरेक्टर पदावर असणारी व्यक्ती होती ती… ती मनोमन शरमली..आणि आज नेमका तोच समोर..

तिची निवड झाली. तिच्या आवाजातील चार गाणी रेकॉर्ड करायचे ठरले.
रहाण्याचा प्रश्न होता. पण तो म्हटला तुझी हरकत नसेल तर माझ्या फ्लॅटवर राहू शकते…दुधात साखर!! तिने लगेच होकार दिला.
कालांतराने त्यांची मने जुळून आली. एकमेकांचे जीवनसाथी बनले.. *पहिल्या भेटीपासून तिला मनोमन हर्ष भरून रहावा असेच वाटत होते.*

*━❀꧁ श्रीकांत दीक्षित © ꧂❀━*

प्रतिक्रिया व्यक्त करा