You are currently viewing स्मृति भाग ६३

स्मृति भाग ६३

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ६३*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
अजून काही योगविद्येबद्दल मार्गदर्शनपर सुभाषिते पाहू या आज .

*सर्वभावविनिर्मुक्तः क्षेत्रज्ञं ब्रह्मणि न्यसेत् ।*
*एतद्ध्यानञ्च योगश्च शेषाः स्युर्ग्रंन्थविस्ताराः ॥*
सर्व भावांमधून मुक्त होवून मनुष्याने आत्म्यास ब्रह्म्यात स्थापित करावे . हेच ध्यान आहे . हाच योग आहे . बाकी सर्व ग्रंथविस्तार आहे .
एवढे सांगितल्यावर त्यांनी ध्यान आणि समाधिचे संयोगाने प्राप्त होणारे पद शाश्वत , धृव व अक्षय असते , असे सांगितले आहे . परब्रह्मास योगीच जाणू शकतो . ते सनातन परब्रह्म सूक्ष्मतेमुळे दाखवले जाण्यासारखे नाही . त्या संदर्भात पुन्हा एक सुंदर श्लोक येतो .

*बुधस्त्वाभरणं भावं मनसालोचनं तथा ।*
*मन्यते स्त्री च मूर्खश्च तदेव बहु मन्यते ॥*
मानसिक चिन्तनामुळे ज्ञानी त्या ब्रह्माचे आस्तित्वासच आभूषण मानतात . पण स्त्री आणि मूर्ख साधारण आभूषणासच बहुत्व मानतात !
तसं पाहू गेलं तर खूप सत्ववान देवगण देखिल विषयाद्वारे वश केले जातात , तिथे सामान्य माणसांचे काय ?? पुढे सन्यास विषयाबद्दल चर्चा आहे . उद्या पाहू .
तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा