You are currently viewing आजचे आत्मचिंतन

आजचे आत्मचिंतन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे अध्यक्ष कवी लेखक पांडुरंग कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*आजचे आत्मचिंतन*

 

*हे जग सुंदर आहे*

*ते मी आणखी सुंदर करेन*

*पण त्यासाठी मला काय करायला हवे?*

 

1. विचार कायम सकारात्मक व सात्विक ठेवायला हवेत

2. अष्टांग योग चा अंगीकार करायला हवा.

निदान तसा प्रयत्न तरी करायला हवा.

3. शडरिपूचा त्याग करणे गरजेचे आहे.

4. सत्कर्म सातत्याने करीत राहावे.

 

कर्म हे महत्वाचे साधन परमेश्वराने आपणास दिले आहे त्याचा सदुपयोग करून आपण आपल्या जीवनाचा शिल्पकार बनू शकतो. आपणच आपल्या कर्माद्वारे आपले जीवन, भविष्य घडवत, बनवत असतो. आपण घडायचे की बिघडायचे हे आपण आपल्या कर्माद्वारे ठरवत असतो.

कर्तव्य म्हणून आपण संसार करावा. तो आनंदाने समजून उमजून करावा. त्यात असक्ती नसावी, विरक्ती असावी. पण विरक्ती असल्याचे जाणऊ देऊ नये. हे कसब अंगी बाणावे. हाच खरा परमार्थ. जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरा जगला.

मानवाला धर्म नावाचा जो काही विशेष अधिकार परमेश्वराने बहाल केला आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. तरच आपण माणूस. अन्यथा पशु आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही. आपण माणूस म्हणून राहण्यास लायक नसल्याने व पशु म्हणूनच लायक असल्याने परत आपणास पशुचा जन्म बहाल होऊ शकतो. म्हणून मानव जन्माचा सदुपयोग करून घेऊ यात. आयुष्याचा प्रवास सुखकर ठेवू यात. भलेही तो छोटा असू दे. काही हरकत नाही, पण तो आदर्शभूत असावा. आनंदी असावा.

आपले आयुष्य किती आहे हे आपल्याला काय किंवा प्राणिमात्रांना काय, कधीच ठाऊक नसते. योगा, ध्यान, प्राणायाम, सत्कर्म आणि सकारात्मक विचार यांनी आपले आयुष्य सुंदर, आदर्श, यथार्थ होण्यास मदत होते. म्हणून आपण या गोष्टींचा अंगीकर करून घेऊ यात.

आपले चांगले नैतिक कर्म, स्वार्थत्याग करणे आणि आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही असे आचरण ठेवणं, इत्यादी गोष्टींनी आयुष्य चांगल व्यतीत होऊ शकते. अश्याने आपल्या चांगल्या कर्माची फलनिती ही पुण्यातच होते यात शंका नाही.

 

……… *पांडुरंग कुलकर्णी नाशिक* ………

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =