You are currently viewing जगण्याची धडपड…!

जगण्याची धडपड…!

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी पत्रकार सागर बाणदार यांचा अप्रतिम लेख

प्रत्येकाच्या मनात श्रध्देनं जपलेल्या देवाचा किंवा निसर्गाचा म्हणा , त्याच्या नियमाचा प्रत्यय अनेक भल्या
बु-या गोष्टींमधून अनुभवास येतो…म्हणजे जसे की ,जिथं काहीच उगवणार नाही ,तिथंही कधीतरी रोपटं उगवून ते विझलेल्या मनात आशेचा किरण जागवत राहतो…तसं त्याचं कुणीच जाणीवपूर्वक रोपन
किंवा देखभाल केलेली नसते ,पण ते असं अचानक कसं ,काय उगवतं ,हेही न उलगडणारं कोडं बनून जातं…पण ,यालाही काही संकेत असतात ,हे तसं पुराव्याशिवाय मान्य न करणं हा मानवी स्वभाव आहे…कधीतरी वा-यासंगे उडून आलेले बीज अन् त्यातून कालांतरानं अंकुरलेलं रोपटं हा तसा कर्मसिध्दांतच असतो…जसं की जे पेरावे ,तेच उगवणार ! खरंतर हा नियम जसा निसर्गाला लागू पडतो ,तसाच तो माणसाच्या कर्मालाही लागू पडतो…खडकाळ किंवा कठीण जागेवर रोपट्याचं उगवणं , ते ऊन – वारा – पाऊस झेलत बहरत जाणं ,आकाशाला गवसणी घालण्यासाठी झेपावणं अशी त्याची विविध रुपं ही खरंतर जगण्याची धडपड अन् त्यातून विविधांगी अनुभवांनी परिपक्व होणं दर्शवतात…म्हणून ,आयुष्यात कितीही संकटांचे फटके बसले ,दु:खाचे डोंगर कोसळले ,काही घावांनी मनाची भक्कम भिंत मोडकळीस आली तरी देखील तोडलेल्या झाडाच्या कुठेतरी उरलेल्या बुंध्यातून एखादं हिरवं रोप अंकुरत पुन्हा बहरत जातं ,अगदी तसंच माणसांनं देखील आव्हानांनी भरलेली
जगण्याची लढाई कदापिही
हार न मानता केवळ जिंकण्यासाठी नव्हेतर स्वतःच्या क्षमता सिध्द करण्यासाठी लढत राहिली पाहिजे ,कारण ,तोच खरा विजयपथ ठरतो…असं जणू कठीण भिंतीतून मोठ्या जिद्दीनं उगवलेल्या या कोवळ्या रोपट्याला सांगायचं असेल ना…!

– सागर बाणदार
मो.८८५५९१५४४०

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + four =