You are currently viewing चिमुकले जगत

चिमुकले जगत

*ओंजळीतील शब्दफुले साहित्य समूह सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा कोल्हे लिखित अभिप्राय वजा पुस्तक परिचय आणि परीक्षण*

 

*चिमुकले जगत*

 

कवयित्री- सौ. जया सुधाकर पाटील

प्रकाशक – साहित्यसंपदा, पेण, रायगड

 

साहित्यसंपदा प्रकाशनाने प्रकाशित केलेला व डोंबिवलीस्थित, खानदेशी लेवारत्न, भाषाप्रभू, ज्येष्ठ साहित्यिक राम नेमाडे यांची समर्पक, सविस्तर व सांगोपांग प्रस्तावना लाभलेला, कवयित्री सौ. जया सुधाकर पाटील यांचा *चिमुकले जगत* हा पहिलाच काव्यसंग्रह. या संग्रहात बालसुलभ प्रश्न आणि , गणपती बाप्पा, पाऊस,निसर्ग, गोगलगाय, चिमण्यादी प्राणी, वाढदिवस, भातुकली, अशा बालविश्वातील, विविध विषयांवर आधारित अशा एकूण चव्वेचाळीस बालकवितांचा समावेश आहे. त्यामुळे हा संग्रह बालांनाच नव्हे व तर त्यांच्या पालकांनाही नक्कीच आवडेल असाच आहे.

 

हा काव्यसंग्रह मुळात हातात घेण्यापूर्वीच त्याचे मुखपृष्ठच वाचकाला आकर्षित करते. रंगीबेरंगी पताकांच्या तोरणाखाली *चिमुकले जगत असे शीर्षक आणि कवयित्रीचे नाव आजूबाजूला दोन पांढरे ढग आणि काही चांदण्या. त्याखाली हिरव्या गवतावर बसून, चित्रमय पुस्तक दाखवणारी ताई अर्थात शिक्षिका आणि समोर जिज्ञासेने ते बघणारी चार बालके. भवतालची फुलझाडे, फुलपाखरू असा निसर्गरम्य परिसर तेवढाच उत्साहवर्धक. असे सजलेले हे बालजगत वाचकाला भुरळ न पाडेल तरच नवल!

 

मनोमय मेडियाने मुखपृष्ठ, सजावट आणि मांडणी अतिशय कौशल्यपूर्ण अशीच केली आहे. पुस्तक पानाची लांबी- रुंदी मोठी, अक्षरांचा आकार मोठा , छपाईची ठळकता स्पष्टता चांगली. यांमुळे बालकाला मांडीवर ठेवून पुस्तक वाचावसं वाटेल असे वाटते.

 

बाह्यरंगाबरोबरच अंतंरंगही तितकेच आकर्षक, रंजक चित्रांनी सजलेले आहे.

 

‘गणपती बाप्पा’ कवितेत बाप्पाचे वर्णन करून कवयित्री आम्हाला संकटातून तारून ने’ अशी बाप्पाची प्रार्थनाही करते.

 

‘उपकाराची फेड’ चिमण्यांची शाळा, कोकिळेच्या बाळाचं बारसं सारख्या काही कवितांत परिचित बोधपर कथा, प्रसंग सहज शब्दांत कवयित्रीने मांडल्या आहेत.

 

बाळाच्या मनात येणारे सहज प्रश्न तिला नेमके कळतात आणि ते कवितेत दृग्गोचर होतात.

‘बाळाचे प्रश्न’ कवितील बाळ उपजत जिज्ञासूवृत्तीचं दर्शन घडवत,

‘आकाशात आजी जात्यात बर्फाचे भरडते काय?, आभाळाच्या चाळणीतून पाऊस खाली गळतो का? असे गंमतीदारप्रश्न विचारतो.

पुढे –

झाडाचे पण कधीच

नाही का दुखत पाय?

ऊन, पाऊस, वादळात

एका जागी उभे सतत!

या ओळीतून कवयित्रीच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडते.

 

कवयित्री अगदी कल्पक आहे. तिला समयोचित विषयही कसे सुचतात पहा..

‘रावणाला झाला कोरोना’ दहा तोंडं आणि दहा नाकं असणारा रावणमुखपट्टी कशी बांधेल ? आणि औषध कसे घेणार?

ती म्हणते,

 

‘गोळ्या दिल्या पोती आठ दहा

त्यासोबत तुम्ही आराम करून पहा’

 

‘प्राण्यांचं संमेलन’ कवितेतील संमेलन तर अगदी खऱ्या संमेलनाचं मूर्तिमंत चित्रच जणूकाही डोळ्यासमोर उभे राहते.

 

सद्य शिक्षणपद्धतीतील ऑनलाईन शिक्षणापासून गणपती बाप्पाही वंचित कसा राहील बरं ! खालील ओळी पाहा-

‘ऑनलाईन आणि ऑफलाईन

आहे का रे वर्ग कैलासावरती?

हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात

भरते शाळा सोडून चार भिंती?’

 

जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणामही सहज सोप्या शब्दांत कवयित्री मांडते. ‘पावसा पावसा’ या कवितेतील ओळी पाहा,

 

‘सूर्याचा चढलाय रागाचा पारा,

वाहतोय बघ गरम गरम वारा

पाण्याविना सजीवांचे होताहेत हाल

झाडे वेली सुकल्यात

चराचर बेहाल’

 

‘इवल्याशा मुंगीने म्हटले ईशस्तवन

वनराजाने केले दीप प्रज्वलन’

तसेच

सुंदर सरोवर, निळसर पाणी

पक्षी गातात मंजुळ गाणी’

यांसारख्या ओळीमधील विशेषणे मनाला भावतात. अंत्ययमक लयदारपणा, नादमधुरता वाढवत कवितेचा दर्जा उंचावतात. कवयित्रीने या सर्व कविता विशेष वृत्तात वा छंदात लिहिलेल्या नाहीत पण तशा कविता लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करावा असे सुचवावेसे वाटते. सर्वच कवितांचा उल्लेख करणं मला इथे शक्य नाही. पण हा काव्यसंग्रह आजी आजोबा, आईबाबा, शिक्षक, पालक, बालक या साऱ्यांच्याच पसंतीस उतरेल असा विश्वास वाटतो आणि म्हणूनच त्यांनी तो विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवावा असे आग्रहपूर्वक सुचवावेसे वाटते.

 

मुळात बालसाहित्यनिर्मिती सोपी मुळीच नाही पण ही लेखनभट्टी कवयित्रीला चांगलीच जमली आहे. ती उत्तम व्हावी यासाठी आणि भविष्यात अधिक लेखननिर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा!

 

पुष्पा कोल्हे

चेंबूर मुंबई 71

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − seven =