You are currently viewing विक्रांत सावंत यांची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती
Oplus_16908288

विक्रांत सावंत यांची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष पत्र

सावंतवाडी :

भाजपचे युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून त्यांना विशेष पत्र प्राप्त झाले आहे.

लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी म्हणून विक्रांत सावंत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील “जन आरोग्य समिती” आणि रुग्णालयातील “रुग्ण कल्याण समिती” यांच्या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पोषण, पाण्याची गुणवत्ता तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये सामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये विक्रांत सावंत यांनी सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या पत्राद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा