You are currently viewing न्हावेली विलगीकरण कक्षासाठी सुधाकर राणे यांच्याकडून थर्मामिटर आणि वाफेची उपकरणे सुपूर्त

न्हावेली विलगीकरण कक्षासाठी सुधाकर राणे यांच्याकडून थर्मामिटर आणि वाफेची उपकरणे सुपूर्त

न्हावेली

न्हावेली ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत विलगीकरण कक्षासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा साई फ्लॉवर मर्चंट चे मालक सुधाकर राणे यांच्याकडून थर्मामिटर आणि वाफेची उपकरणे देण्यात आली आहेत. त्याबद्दल सरपंच सौ प्रतिभा गावडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने गावागावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. न्हावेली ग्रामपंचायतने स्थापन केलेल्या गाव विलगीकरण कक्षास दात्याकडून आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली जात आहे. या कक्षातील रुग्णांना वाफ घेता यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर राणे यांच्या कडून आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित साधून गावाला उपकरणाच्या माध्यमातून भेट दिली.

यावेळी राजन चेंदवनकर, साईगणेश राणे, श्रीपाद राऊळ, माजी सरपंच शरद धाऊसकर, सामाजिक कार्यकर्ते बाळू सावळ, उदय पार्सेकर आदी उपस्थित होते. त्याबद्दल सरपंच सौ प्रतिभा गावडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा