You are currently viewing अपघातास कारणीभूत ठरणारी “सुसाट” डंपर वाहतूक रोखा..

अपघातास कारणीभूत ठरणारी “सुसाट” डंपर वाहतूक रोखा..

वेंगुर्ला मनसेची मागणी; पोलीस निरीक्षकांना निवेदन,कारवाईची मागणी

वेंगुर्ले

तालुक्यात आणि रेडी बंदरात दरम्यान होणाऱ्या खनिज वाहतूक करणाऱ्या सुसाट गाड्यावर आणि चालकांवर योग्य तो अंकुश ठेवण्यात यावा, त्यासाठी आवश्यक असली भरारी पथके नेमण्यात यावी, संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज मनसेच्या वतीने वेंगुर्ले पोलिस निरीक्षकांकडे करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्याकडून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे. यात असे म्हटले आहे की, आजगाव येथे दोन दिवसापूर्वी अपघात घडला होता. त्या एका दाम्पत्याला मृत्यू पत्करावा लागला, तर काही जण जखमी झाले आहेत. गेले काही दिवस या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढत आहे, सुसाट जाणारे डंपर लक्षात घेता त्या वाहतुकीला कोणाचा लक्ष नाही, त्यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी. संबंधित डंपर चालकांना स्पीड लिमिट घालून देण्यात यावे, दारू पिऊन वाहतूक करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, परप्रांतीय मजुरांचे रेकॉर्ड ठेवण्यात यावे, संबंधितांची कागदपत्रे व परवाने द्यावेत, ताडपत्री व आवश्यक असलेल्या उपाययोजना अविनाश संदर्भात संबंधित डंपर चालकांना सूचना करण्यात यावा, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तरी आपल्या मागणी लक्षात घेता याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =