You are currently viewing कुडाळ मराठा समजाकडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्याना २३,१०७ सह्यांचे निवेदन…..

कुडाळ मराठा समजाकडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्याना २३,१०७ सह्यांचे निवेदन…..

मराठा बांधवानी केला सरकारचा निषेध….

कुडाळ / पूनम राटुळ :

मराठा आरक्षणाच्या मुद्याने पून्हा एकदा जोर धरला आहे. मराठा बांधवांनी कुडाळ तहसीलदार यांच्या मार्फत आज मुख्यमंत्री यांना २३ हजार १०७ सह्यांचे निवेदन दिले. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यावर पुन्हा मराठा बांधव पेठुन उठले आहेत. आज कुडाळ तालुक्यात मराठा बांधवांनी २३ हजार १०७ सह्यांचे निवेदन कुडाळ तहसीलदारअमोल फाटक यांच्याकडे देत तहसील कार्यालयाच्या बाहेर एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा केल्या. यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी कुडाळ तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आज सोमवार रोजी तहसीलदार कार्यालया वर धडक दिली.कुडाळ तालुक्यातील स्थानिक प्रशासन व मराठा समाजात शाब्दिक बाचाबाची झाली. तर जिल्हा प्रशासनाने मराठा आंदोलनाकडे कानाडोळा केला म्हणून मराठा समाजाच्या वतीने तालुका व जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 65%मराठा समाज राहतो आज आंदोलनाची निवेदन स्वीकारताना कसलीही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार आमदार मराठा समाजाचे असताना मात्र जिल्हा प्रशासनाने मराठा समाजाला वाऱ्यावर सोडलेलं पाहायला मिळत आहे, मराठा समाजाच्या वतीने आज 23 हजार 107 लोकांनी सह्या केलेले निवेदन कुडाळ तहसीलदार फाटक यांना देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने मराठा आंदोलनाकडे गांभीर्याने पहावे नाहीतर मराठा समाजाने गांभीर्याने बघितलं तर जिल्हा पळता भुई होईल. मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समनव्यक सुहास सवांत यांनी दिला इशारा लवकरच जिल्ह्यात मराठा समाज आक्रमकपणे पाहायला मिळणार अस ते बोलत होते..

यावेळी निवेदन देताना ऍड सुहास सावंत, संग्राम सावंत, प्रभाकर सावंत, बंड्या सावंत, सुनिल सावंत, राजू राऊळ, सचिन काळप, शैलेश काळप, सुंदर सावंत, विजय सावंत, अभिषेक गावडे, वैभव जाधव, सचिन सावंत, शैलेश घोगळे, अमरसेंन सावंत, भाई साटम, श्याम सावंत, झेंडे, संजय लाड, प्रफुल्ल सुद्रीक, बंटी राऊळ, महाडदेव, राजवीर पाटील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 5 =