You are currently viewing गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कणकवली बसस्थानकावर आरोग्य पथक तैनात

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कणकवली बसस्थानकावर आरोग्य पथक तैनात

कणकवली :

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर आणि गतवर्षाचा कोरोना महामारीचा काळ लक्षात घेता कणकवली बस स्थानकावर आजपासून आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.सध्या पावसाळा सुरू असून सण उत्सवाच्या कालावधीत अनेक लोक बाहेरून येत असतात. मात्र अलीकडेच कोरोनाचे संकट काही प्रमाणात दूर झाले आहे. परंतु पावसाळ्यात अनेक आजार डोकीवर करतात. यासाठी आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात गणेशोत्सव कालावधीत प्रत्येक बसस्थानकांवर आरोग्य पथक तैनात करण्यात येते.

कणकवली बसस्थानकावर आजपासून आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून याठिकाणी देखील सर्व आजारांवर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सध्या बसस्थानकावर आरोग्य सहाय्यक संजय सावंत, भालचंद्र साळुंखे आरोग्य सेवक, एस. व्ही. चिंदरकर आरोग्य सेविका सातरल हे अधिकारी कार्यरत आहेत. लक्षण असणाऱ्या नागरिकांनी आपली काळजी घ्यावी व आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा