*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लेक चालली सासरी..*
लेक चालली सासरी, लेक चालली सासरी
एका दाव्यातून सुटे बंध दुसऱ्याच्या घरी..
खोडा पायात जन्मता फक्त बदलते जागा
“घास” तेच खावयाचे दाबूनच साऱ्या रागा..
म्हणे भांडे ते काचेचे येरवाळी उजवावे
चुके प्राक्तन कोणाला जे जे आले ते भोगावे..
साळसूद दुनिया ही म्हणे लक्षुमी घरची
धुनी मिरचीची द्यावी रोज हुंगवावी मिरची..
तोंडदाबून सोसते होते माहेर पारखे
उखळात असे डोके असो आपले परके..
सोससोसून तावूनसुखाखून ती निघते
नाही ओठ उसवत नाही उपयोग जाणते..
पोटपसारा फुलतो जगणेच होते प्राप्त
जगे लेकरांच्या साठी कधी होत नाही मुक्त..
रांधावाढाउष्टीकाढा फुकटची सेवेकरी
मोल तिचे न जाणती गेली जरी ती अंबरी..
आत एक बाहेर एक दुटप्पी हे जग सारे
यांच्या मनात वाहती सदा दुष्टाव्याचे वारे..
दोन घरचा हा दिवा दोन घरची पताका
निभावते खानदानी काय सांगावी हो कथा..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
