You are currently viewing ध्यास मुक्तीचे

ध्यास मुक्तीचे

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ध्यास मुक्तीचे*

~~~~~~~~~

या सुंदर

लोभस सांजवेळी

प्रतिबिंब

तुझ्याच आठवांचे

 

अंतरी

शब्दभावनांचे काहूर

नभांगणी

रंग सारे संचिताचे

 

मीच आजला

स्वतः शोधतो

सत्य साक्षात्कार

दिव्यत्वाचे

 

ब्रह्माण्ड

दीपविता लोचनांना

जीवा लागती

ध्यास मुक्तीचे

 

जरी ते

अतर्क्य अनाकलनीय

रूपरंग सारेच

त्या सर्वेश्वराचे

~~~~~~~~~~~~~~~

. *©️विगसातपुते*

. *11 मे 2026*

प्रतिक्रिया व्यक्त करा