You are currently viewing अंधांना ही कळते दिवाळी

अंधांना ही कळते दिवाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अंधांना ही कळते दिवाळी*

 

 

डोळे नाहीत तरी उजेड,

हातावरती दिवा तेज ॥ध्रु॥

 

आम्ही नाही पाहिला दिवा,

हातांनी जाणला दिवा ॥१॥

 

तेलाचा वास घमघमे,

आई जवळ आहे गमे ॥२॥

 

फटाक्याचा नाद कानी,

मनात फुलते रोषणाई रानी ॥३॥

 

लाडू हातावर ठेवला,

गोड प्रकाश चाखला ॥४॥

 

लोक म्हणती अंधार जाई,

आम्हा अंधार कधीच नाही ॥५॥

 

मनात आमचा दिवा जळे,

कधीच नाही तो विझे ॥६॥

 

दिवाळी म्हणजे काय सखे,

पाहणं की अनुभवणं सखे? ॥७॥

 

इंदुमाय म्हणे ऐका,

मनाचा दिवा मोठा करा ॥८॥

 

॥ इति श्री अंधांची दिवाळी संपूर्ण ॥

 

✍️ श्री प्रभाकर गजमल भामरे पाटील धुळे (इंदुमाय)

प्रतिक्रिया व्यक्त करा