उत्कृष्ट स्त्रीची भूमिका करणारे कुडाळ-मोरे गावातील शंकर मोर्ये यांचे निधन…

उत्कृष्ट स्त्रीची भूमिका करणारे कुडाळ-मोरे गावातील शंकर मोर्ये यांचे निधन…

कुडाळ:

कुडाळ मधील मोरे गावचे मोरेश्वर दशावतार कंपनीचे मालक व स्त्री भूमिका साकारणारे शंकर मोर्ये(वय ५२) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कुडाळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. गेले काही दिवस ते आजारी होते.

दशावतार मधील उत्कृष्ट स्त्री भूमिका करणारे सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट दशावतार म्हणून ख्याती असलेले नामवंत कलाकार होते.त्यांच्यावर ओरोस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात वडील, बायको, विवाहित तीन मुलगे,दोन मुली, सुना, पुतणे, व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा