You are currently viewing दत्त माझा मी दत्ताचा

दत्त माझा मी दत्ताचा

दत्त माझा मी दत्ताचा
भक्त हा मी दत्ताचा…!!धृ!!

दत्त माझा दाता,
दत्त माझा त्राता,
सिद्धीदाता हा दत्त माझा.
दत्त माझा…… !!१!!

दत्त माझा कृपासिंधू,
दत्त माझा आनंदू,
परमानंदू हा दत्त माझा.
दत्त माझा….. !!२!!

दत्त निर्गुण निराकार,
दत्त भक्तांचा आधार,
आत्मस्वरूप हा दत्त माझा.
दत्त माझा …. !!३!!

दत्त कैवल्याची मूर्ती,
दत्त मूर्तिमंत ज्ञान,
सच्चिदानंद हा दत्त माझा.
दत्त माझा….. !!४!!

दत्त माझा एकमुखी,
दत्त माझा त्रिमुखी,
औदुंबरतळी हा दत्त माझा.
दत्त माझा, मी दत्ताचा,
भक्त हा मी दत्ताचा….!!५!!

(दिपी)✒
दीपक पटेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − ten =