You are currently viewing ओंजळ प्रेमाची

ओंजळ प्रेमाची

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक-कवी दीपक पटेकर यांची अप्रतिम काव्यरचना

खरंच…
किती नादान रे तू…
नादान म्हणू..? की स्वार्थी..?
तुझ्या एका एका सुखासाठी तुटले मी…
जसा तारा तुटतो अवकाशातून…!
निस्वार्थ भावनेने…
जो जे मागेल ते देण्यासाठीच…!
पण, तुला समजलंच नाही माझं मायेनं भरलेलं मन…
ना समजली माझ्या अंतर्मनातील तळमळ…
ना तुझ्यासाठीची कळकळ…
वैशाखातही हृदयाला सुटायचा पाझर…
वहायचे नयन माझे जणू कठोर खडकातील निर्झर…
नयन पटलावर दिवसा रात्री तुझाच भास व्हायचा…
हृदयाच्या आरशात चेहरा तुझाच दिसायचा…
नाव नव्हतंच..तुझ्या माझ्या प्रेमाला…
होत्या केवळ भावना…!
मूकपणे अधर अधरांशी बोलायचे…
अन्…त्या स्पर्शात प्रेम फुलायचे..
ओंजळ प्रेमाची…
मी मुक्तपणे रीती केली होती तुझ्या ओंजळीत…
ओंजळीतील मोगरा वाहतो ईश्वर चरणी….तशीच….!
पण….
तुला जपता आलं नाही माझं प्रेम…
तुझ्या हृदयात…
ना मनात…डोळ्यात..भाव भावनांत…
ना तुझ्या ओंजळीत…
अन्…
ओंजळ माझ्या प्रेमाची…केव्हाच रीती झाली…कायमचीच…!

©[दीपि]
दीपक पटेकर, सावंवाडीती
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 12 =