You are currently viewing प्रमोद जठार यांचा विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल; भाजपच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती

प्रमोद जठार यांचा विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल; भाजपच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती

कणकवली :

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. भाजपच्या या उमेदवारीमुळे विधानपरिषद निवडणुकीत पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये होती.

या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा