*जागतिक साकव्य विकास मंच सदस्य तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुरु नानक जयंती*
नानकांच्या हाती तलवार,
वाहेगुरूंचा गाजे दरबार.
जातपात ही माणसाची भिंत,
ढोंग पाखंड हीच त्याची चिंत,
शब्दात आग, दृष्टीत धार,
मनातील अंधार छेदे तलवार.
देव ना मंदिरात कैद,
देव ना मशिदीत कैद,
भुकेल्याला भाकर हा उपकार,
सत्याचा आवाज हाच दरबार.
निरभऊ, निरवैर, यात नाही भय,
किरत करो, नाम जपो, यातच जय,
माणूस माणसाला विसरला संसार,
नानकांची तलवार हाच दरबार.
सतनाम जप ओठी मुखी,
मनात प्रकाश, हातात सेवा सुखी,
धर्मावर रक्त नको, प्रेम अपार,
नानकांचा संदेश हाच दरबार.
इंदूप्रभा
प्रभाकर भामरे
