You are currently viewing ।।श्रीकृष्ण प्रेम।।

।।श्रीकृष्ण प्रेम।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*।।श्रीकृष्ण प्रेम।।*

 

होऊन जाऊ दंग श्रीकृष्ण नामांत

भिजून जाऊ राधाकृष्ण रंग रंगांत।।धृ।।

 

भारावतो ऐकून मुरलीचा नाद

शहारे अंग कान्हा तव अस्तित्वांत

वाटे प्रसन्न सृष्टी जाई भारावून।।1।।

 

रूप तुझे दिसावे जळी स्थळी सर्वत्र

साठवतो प्रतिमा हृदयमंदिरात

मृगजळ न व्हावे मूर्ती दिसूदेत।।2।।

 

बाळ गोपाळांचा मेळा पहात वाट

गोपगोपी आसुसले तव दर्शनार्थ

रासक्रीडेसाठी सर्व थांबले तिष्ठत।।3।।

 

तुझ्या कृष्ण लीला भावती रुचतात

खोडकरपणा तुझ्या अंगांत रोमांत

तू प्रेमाचे प्रतिक याचितो आशीर्वाद।।4।।

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा