You are currently viewing भान

भान

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी लेखक मुबारक उमरानी यांची काव्यरचना

मऊमऊ मातीतच
खेळतच बसतीस
मातीसवे खेळतांना
खुदूखुदू हसतीस

पाणी माती मिसळुनी
होतो तुझा छान खेळ
अंगावर चिखलाचा
बसे चित्राचाच मेळ

भातुकला सजवता
बसे नटून खुशाल
छोट्या चिंधीत सजता
भातुकलीचे हो हाल

भातुकला खेळतांना
घेई रंगीत खेळणी
भातुकलीच्या हातात
फुटकीच हो चाळणी

तुटक्याही खेळण्यात
भातुकलीचा संसार
दिसे आनंदी सागर
हेच जगण्याचे सार

एका चिंचेच्या पानात
जेवणाचा सजे थाट
भातुकलीच्या संसारी
भरे मोद काठोकाठ

आसुभऱ्या डोळ्यातही
गाते संसाराचे गाणं
मोती अश्रूथेंबातही
असे जगण्याचे भान

©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा