You are currently viewing || त्यागाची मूर्ती ||

|| त्यागाची मूर्ती ||

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी श्री मनोहर झोरे यांची काव्यरचना

नाही मोह त्यास, ना कशाचीही आस
त्यागाची ती मूर्ती होती ,गाडगे महाराज |

डेबूजी नावं त्यांचं ,होती किर्ती महान
मनात होती त्यांना, माणुसकीची जाण |
मुक्या जनावरांचा उगा, जीव जात होता
दगडाचा देव तो ,बळी पाहत होता |
खाल्ला नाही त्याने ,पुढे ठेवलेला नैवद्य l
दिलेला घासही तो देव, का नाही शिवत |
प्रश्न सोडवण्या धरिला, शिक्षण अट्टाहास
त्यागाची ती मूर्ती होती, गाडगे महाराज |

वैराग्याचे रुप त्याचे,ना अपेक्षांचा धनी
मुखी नाम गोपाला ,जनसेवाच त्याच्या मनी |
घेऊन खराटा हाती ,गावोगाव झाडी
गावासंगे मनातील ,घाण ही तो काढी |
दीनदुबळ्याची सेवा, नव्हता प्रतिष्ठेचा साज
त्यागाची ती मूर्ती होती ,गाडगे महाराज |

कीर्तना संगे वादनाला, दगडगोटे घेई
कीर्तना सवे व्यसनमुक्तीचा, संदेशही देई |
एक मडका एक झोळी, चिंध्या नेसलेला
जगासाठी त्याने जणू ,जन्म घेतलेला |
स्वावलंबी जगणं त्याचं,नव्हती कामाची लाज
त्यागाची ती मूर्ती होती गाडगे महाराज |

मनोहर गोपाळ झोरे

प्रतिक्रिया व्यक्त करा