You are currently viewing सावंतवाडीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर डंका — “गाभारा” चित्रपट प्रथम क्रमांकाचा मानकरी!

सावंतवाडीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर डंका — “गाभारा” चित्रपट प्रथम क्रमांकाचा मानकरी!

सावंतवाडीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर डंका — “गाभारा” चित्रपट प्रथम क्रमांकाचा मानकरी!

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे सुपुत्र, युवा लेखक-दिग्दर्शक श्री. गजेंद्र शाम कोठावळे यांनी लेखन, दिग्दर्शन आणि गीतरचना केलेला “गाभारा” हा हृदयस्पर्शी लघुचित्रपट अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मराठी लघु चित्रपट महोत्सवात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

मयूर परदेशी फिल्म्स आयोजित या प्रतिष्ठित महोत्सवामध्ये महाराष्ट्रासह विविध भागांतून जवळपास ३०० हून अधिक लघुचित्रपट सहभागी झाले होते. विविध विषय, दमदार कथा आणि उत्कृष्ट अभिनयांनी सजलेल्या या स्पर्धेत “गाभारा” चित्रपटाने आपल्या भावनिक आणि वास्तवदर्शी कथेमुळे परीक्षकांची मनं जिंकत सर्वोच्च मान पटकावला.

या चित्रपटाचे निर्माते श्री. शिवाजी विष्णू पाटील असून, चित्रपटाचे संपूर्ण लेखन, दिग्दर्शन आणि गीतरचना सावंतवाडीतील प्रतिभावान कलावंत श्री. गजेंद्र शाम कोठावळे यांनी केली आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवामध्ये उत्कृष्ट लेखनासाठी देखील “गाभारा” चित्रपटाची निवड झाली असून, त्याचे श्रेय श्री. कोठावळे यांच्या प्रभावी लेखणीतून उभ्या राहिलेल्या कथेला दिले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा