डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोडामार्ग तालुकास्तरीय जयंती उत्सवाला मंत्री. मा. दिपकभाई केसरकर यांची लाभणार विशेष उपस्थिती

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोडामार्ग तालुकास्तरीय जयंती उत्सवाला मंत्री. मा. दिपकभाई केसरकर यांची लाभणार विशेष उपस्थिती*

तालुकास्तरीय जयंती उत्सवाची जय्यत तयारी : शेकडोंच्या संख्येने उपस्थितीत राहणार तालुक्यातील भीमबांधव

*दोडामार्ग / प्रतिनिधी*

भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर कायदे पंडीत, सामाजीक क्रांतीचे प्रणेते, मानवतेचे व मानवता वादाचे थोर प्रवर्तक, भारतरत्न, बोधीसत्व, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा. तालुकास्तरीय भव्य जयंती उत्सव कार्यक्रम आर. पी. आय. (आठवले), सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ (मुंबई), तालुका शाखा दोडामार्ग,जय भीम युवा मंडळ रमाईनगर झरेबांबर आणि भीम वॉरीयर्स पंचशील नगर दोडामार्ग यांच्या सयुक्त विद्यमाने रविवार दि. १४ एप्रिल २०२४ रोजी दोडामार्ग येथील महाराजा हॉल येथे मोठया उत्साहात साजरा होत. आहे. याची जय्यत तयारीही युद्ध पातळीवर सूरु आहे.या कार्यक्रमाला मंत्री मा.दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दर वर्षी भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाते.या वर्षीही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती कार्यक्रम रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी दोडामार्ग येथील महाराजा हॉल येथे मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा.ना.दिपकभाई केसरकर,आर.पी.आय. (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव आयु. रमाकांत जाधव, कसई दोडामार्ग नगराध्यक्ष मा. चेतन चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष :-आयु. अर्जुन कृष्णा आयनोडकर (उपसरपंच ग्रा. पं. झरे-२ तथा खजिनदार: सिंधुदुर्ग बौध हितवर्धक महासंघ मुंबई तालुका शाखा दोडामार्ग, विशेष निमंत्रित मा गणेशप्रसाद गवस (माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग), मा.शंकर झिलू जाधव (सचिव आर. पी. आय. (आठवले) कोकण विभाग तथा अध्यक्ष :-सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ (मंबई) तालुका शाखा दोडामार्ग), मा. प्रकाश लक्ष्मण कांबळे (जिल्हा सरचिटणीस आर. पी. आय. (आठवले) सिंधुदुर्ग, प्रमुख वक्ते आदरणीय धम्मचारी तेजबोधी (त्रिरत्न बौध्द संघ सिंधुदुर्ग), आयु. अंकुश जाधव (माजी समाज कल्याण अधिकारी जि. प. सिंधुर्ग),स्वागताध्यक्ष आयु. रामदास कांबळे (तालुका अध्यक्ष आर. पी. आय. (आठवले) दोडामार्ग), त्याचं बरोबर आयु. चंद्रकांत जाधव (जिल्हा उपाध्यक्ष आर. पी. आय. (आठवले) सिंधुदुर्ग),आयु. सखाराम कदम (कार्याध्यक्ष आर. पी. आय. (आठवले) सिंधुदुर्ग जिल्हा,आयु. नवसो वसंत पावसकर (सचिव आर. पी. आय. (आठवले) दोडामार्ग), आयु. मनोहर गोविंद जाधव (उपाध्यक्ष आर. पी. आय. (आठवले) दोडामार्ग), श्रीमती. ज्योती रमाकांत जाधव (नगरसेविका नगरपंचायत कसई – दोडामार्ग), श्रीमती. क्रांती महादेव जाधव (नगरसेविका नगरपंचायत कसई – दोडामार्ग), पत्रकार शंकर मधुकर जाधव, आयु. संदीप आनंद जाधव (सचिव जय भीम युवा मंडळ रमाई नगर झरेबांबर), आयु. प्रेमानंद यशवंत पालयेकर (कार्याध्यक्ष आर. पी. आय. (आठवले) दोडामार्ग) सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा – रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वा. प्रतिमा पुजन, बुध्द वंदना, त्रीसरण पंचशिल, सकाळी १०.०० वाजता विशेष सत्कार, सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजता मान्यवरांची मनोगते,दुपारी २.०० ते ३.०० वाजता भोजन, दुपारी ३.०० ते सं. ४.०० वाजता भीमगितांचा कार्यक्रम तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा