You are currently viewing चंद्राची दुसरी बाजू!

चंद्राची दुसरी बाजू!

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*चंद्राची दुसरी बाजू!*

दुस-यांना आनंद वाटण्याऐवजी
स्वतः आनंदाच झाड बन
ह्दयात कोरून घे माणसं !अन् गा
पानगळीच पसायदान ..!

पिंगा घालीत वारा
येईल तुझ्या परसात
सांग त्या वा-याला कर आनंदाची बरसात ..!

परक्या डोळ्यातला तू
पाऊस काढून घे
चंद्राची दुसरी बाजू
अंधारातून प्रकाशात घे ..!

आनंदाच्या तुझ्या सोहळ्यात
रंगेल तुझे रिंगण
कर आनंदाचा वंशविस्तार
मोकाट सोड तुझे आंगण ..!

नव नवे नविन क्षितिज शोधून
आकांक्षाच्या बिया पेर
चैतन्याची पाखर येवून बसतील
उगवेल आनंद चेहर्‍यावर ..!

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा