You are currently viewing आई भराडी

आई भराडी

*चालतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्य लेखिका कवयित्री सौ.आदिती मसूरकर लिखित आंगणेवाडी जत्रोत्सव विशेष काव्यांजली काव्यरचना*

*आई भराडी*

आई भराडी
मागे वळून पाहताना
एकटीच राहताना
आठवते

आले धावून
माते तुझ्या दर्शनासाठी
टेकीत काठी
गर्दीतुनी

डोळे भरून
रूप तुझे पाहते
पुष्पे वाहते
चरणांशी

कोकणची माता
भक्तांच्या हाकेला धावते
नवसाला पावते
देवी

अवघ्या विश्वात
पसरली तुझी कीर्ती
सात्विक मूर्ती
भराडीची

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*✍️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + six =