*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शलोमित खान लिखित अप्रतिम लेख*
*हिंदी चित्रपटातील भय गीते*
आजच्या माझ्या लेखाचे हे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलेच असेल की मी आज कोणत्या विषयावर माझा हा लेख प्रस्तुत करत आहे. हिंदी हिंदी चित्रपटांमध्ये भय गीते मला वाटते या विषयावर फारसे लिहिले गेलेले नाही म्हणूनच हा विषय मी निवडला आहे. तसे पाहिले असता हिंदी चित्रपटांमध्ये जी गीते आलेली आहेत त्यामध्ये कुठलाही भाव कुठलाही विषय सोडला गेलेला नाही. हिंदी चित्रपट गीतांमध्ये सर्वात जास्त गाणे हेही प्रेम गीते आहेत. त्यामध्ये देखील विरहाची गाणी आणि मिलनाची गाणी या दोन्ही प्रकारावर मोजता येणार नाहीत इतकी गाणी लिहिलेली आहेत. याचबरोबर निसर्ग त्यामध्ये चंद्र तारे समुद्र समुद्रकिनारा झाडे जंगल डोंगर आणि दर्या नदी हिरवाई फुले असे असंख्य विषय हाताळले गेले आहेत. विविध पशु पक्षांवर देखील गाणी लिहिली गेली आहेत. प्रेमिकाच्या किंवा प्रेमीच्या प्रतारणे बद्दल म्हणजेच बेवफाई बद्दल ही खूप गाणी आढळतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वाहनातून केलेले प्रवास सफर यावरही गाणे आढळतात तसेच हास्य गीते भक्ती गीते अध्यात्मिक गीते प्रेमी प्रेमिका मधील एकमेकांना चिडवणारी गीते सवाल जवाब असलेली गीते बालगीते देशभक्तीपर गीते ममता गीते अशा अनेक विषयांवर अनेक कवींनी आपले काव्य प्रस्तुत केले आहे बऱ्याच वेळा सामाजिक प्रश्नांना घेऊन ही काव्य लिहिले गेले आहे. त्याचप्रमाणे आजचा आपला जो विषय आहे त्या विषयावर देखील अनेक गाणी लिहिलेली आपल्याला आढळून येतील. माणसाच्या मनात कशाला कशाच्या विषयी भय आढळून येते कधी अंधाराचे भय कधी एकटेपणाचे भय कधी जंगलचे भय कधी अनोळखी जागेमध्ये किंवा घरामध्ये गेल्यावर वाटलेले भय कधी अचानक दिसलेल्या व्यक्तीविषयीचे भय असे भयाचे देखील प्रकार आपण सांगू शकतो. असे जरी असेल तरी देखील माणसाला भयकथा ऐकायला आणि वाचायला आवडतात त्याचप्रमाणे भय चित्रपट किंवा नाटक पाहायला आवडतात. हॉरर फिल्म आहे म्हणताच लोकांचे पाय आपोआप थेटर गृहाकडे वळू लागतात. या चित्रपटांमध्ये एक ना एक भय गीत असलेले आपल्याला आढळून येईल. या भय्या घेताना रहस्यमय गीते किंवा हिंदी मध्ये भुतिया गीते आणि इंग्लिश मध्ये हॉंटेड सॉंग असेही म्हटले जाते. चित्रपटांमध्ये हे गाणे अशा प्रकारे दाखविली जातात हे पाहणारा थोडासा घाबरून जातो पुढे काय होते आहे ही उत्सुकता ही त्याच्या मनात असते तरीपण एक प्रकारचे आकर्षण या गीतांमध्ये असते. आजच्या या माझ्या लेखांमध्ये मी अशाच काही गीतांचा परामर्श घेतलेला आहे. एक गोष्ट येथे मी नमूद करते की जी गाणे खूप जास्त प्रसिद्ध झाली अशीच भय गीते मी निवडलेली आहेत ती तुम्हा सर्वांना ही माहीत असतील. अनेक चित्रपट भय चित्रपट म्हणून अलीकडच्या काळात आलेले आहेत. यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते रामसे बंधू यांचे चित्रपट उदाहरणार द्यायचेच झाले तर दो गज जमीन के नीचे, पुराना मंदिर, पुरानी हवेली ही काही नावे आहेत, त्यांना सोडून अन्य काही लोकांनीही भय चित्रपट काढलेले आहेत पण ते फारसे चालले नाहीत आणि त्यांची गाणी ही चालली नाहीत. तेव्हा या लेखांमध्ये मी फक्त प्रसिद्ध चित्रपट आणि त्यातील प्रसिद्ध गाणे यांचा उल्लेख करणार आहे.
हिंदी चित्रपटांमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सर्वात पहिला हिंदी भयपट कमाल अमरोही दिग्दर्शित अत्यंत गाजलेला हा चित्रपट महल या नावाने ओळखला जातो. अशोक कुमार आणि मधुबाला यांच्यासारखे कसबी कलाकार जोडीला राजकुमारी जुन्या काळातील ही एक गुणी अभिनेत्री ती केवळ अभिनेत्रीच नव्हती तर गायिका ही होती तिचीही या चित्रपटांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही कारण तिने अशोक कुमारच्या दुर्लक्षित पत्नीची भूमिका साकारलेली आहे चित्रपटांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. परंतु या चित्रपटामध्ये अशोक कुमारचा अप्रतिम अभिनय मधुबालाचे अप्रतिम सौंदर्य याची कथा कथेमध्ये गुंफलेले रहस्यमय वातावरण एकंदर सर्व परिसर या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. अशोक कुमार चित्रपटाचा नायक अपघाताने एका बरसाती रात मध्ये मोठ्या हवेलीचा आश्रय घेतो आणि तेथूनच सुरुवात होते एका भयावह रहस्याची. त्या हवेली मध्ये अशोक कुमारला स्वतःचाच भव्य असा फोटो भिंतीवर लावलेला दिसून येतो आणि अचानक तो ज्या आश्चर्यचकित आणि थोडासा घाबरलेल्या स्थितीत आहे कानावर ऐकू एक येऊ लागतात एका गाण्याचे स्वर आणि त्याला दुरूनच दिसते एक सुंदर तरुणी जी कधी दिसते कधी अदृश्य होते आणि गात असते हे गीत
आयेगा आयेगा आयेगा
आयेगा आनेवाला आयेगा आयेगा.
रोमांचित करणारे उत्कंठा वाढवणारे ते गीत ज्याप्रमाणे नायक जो थोडासा घाबरलेला आहे पण मनामध्ये एक आकर्षण आहे कोण आहे ती तरुणी जी हे गीत गात आहे का गात आहे कोणासाठी गात आहे इतक्या रात्री ती इथे कशी आली असे अनेक प्रश्न मनातल्या मनात करून तो तिचा पाठलाग करतो ती कधी दिसते झोपाळ्यावर नावे मध्ये आणि अदृश्य होते. हा सर्व प्रसंग आणखीनच उठावदार झाला आहे तो वरील भय्या गीताने आयेगा आनेवाला आयेगा आयेगा. हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये लागण्याच्या पहिलेच हे गाणे जिकडे तिकडे ऐकू येऊ लागले होते अतिशय लोकप्रिय झाले होते आणि लोक अतिशय उत्सुक होऊन चित्रपटाची वाट पाहत होते. या गाण्याच्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगावीशी वाटते तीही की हे गाणे स्वर सम्राज्ञी गाणं कोकिळा लता मंगेशकर ची यांनी गायले आहे. लता मंगेशकर यांचा प्रवेश हिंदी चित्रपटांमध्ये झाला होता याआधी त्यांनी राज कपूर निर्मित बरसात या चित्रपटातील सर्व गाणी गायली होती आणि ती गाणी लोकप्रिय ही झाली होती. परंतु लताजींच्या बरोबरच त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीवर जुन्या गायिका सुरय्या नूर जहान शमशाद बेगम राजकुमारी यांचाही खूप दबदबा होता आणि लताजींना फार जास्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळालेली नव्हती त्यांची पुढे यायची धडपड चालू होती. परंतु लताजींचे हे गाणे प्रसिद्ध झाले आणि असे प्रसिद्ध झाले की लोक त्या गाण्याने अक्षरशः वेडावून गेले. या एका गाण्याने लता मंगेशकर ना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतर त्यांचे हे स्थान कोणीच हिरावून घेऊ शकले नाही. बघता बघता त्या कालच्या सर्व गायिकांना मागे टाकून लताजींचा लोकप्रियतेच्या आणि यशाच्या मार्गाची सुरुवात झाली.
महल या पहिल्या भय चित्रपटानंतर त्याचे यश आणि लोकप्रियता पाहून त्यानंतर अनेक महान दिग्दर्शकांनी अनेक घटनांवर आधारित भय्या चित्रपट काढायला सुरुवात केली. आता मी एका मागून एक अशा चित्रपटांची यादीच आपल्यासमोर ठेवणार आहे आणि त्यामध्ये असलेली भय गीते हंटिंग सॉंग्स आपल्यासमोर ठेवणार आहे ज्या गाण्यांना चित्रपटांमध्ये बघताना भीती वाटते आणि त्यांचे आकर्षणही वाटते.
यानंतर आलेला आणि गाजलेला भय चित्रपट होता पूनम की रात. या चित्रपटामध्ये मनोज कुमार आणि कुमुद छुगानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मला वाटते कुमुद छुगानी ही अभिनेत्री अनेकांना माहितही नसेल कारण ती फारशी चमकली नाही तिथे तीन-चार चित्रपट आले आणि तिने हिंदी चित्रपटाला राम राम केला. कदाचित हा चित्रपट बऱ्याच लोकांना माहीत नसेल परंतु यातले हे भयगीत मात्र खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले होते हे गाणे देखील नायकाला अंधारलेल्या रात्री मध्ये ऐकू येत असते पण कोण गाते आहे ते दिसत नाही आणि त्याच्याबरोबर प्रेक्षकांची उत्सुकता ही वाढत जाते. हे गाणे लता मंगेशकर यांनीच गायलेले आहे आणि ते गाणे आहे
साथी रे साथी रे तुझे बिना जिया उदास रे
यह कैसी अनबूझ प्यास रे
साथी रे साथी रे।
या नंतर टावर हाउस नावाचा चित्रपट आला होता ज्यामध्ये शकीला आणि अजित यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शकीलाच्या अर्थात नायिकेच्या आईला एका इमारतीमध्ये कैद केलेले असते. नायिका तिच्या शोधात तेथे जाते तीही बंदिस्त होते आणि त्या इमारतीतून एक गाणे सतत ऐकू येऊ लागते ते गाणे होते परत एकदा लताजींच्याच आवाजात
ए मेरे दिले नादान तू गम से ना घबराना
एक दिन तो समझ लेगी दुनिया तेरा अफसाना।
या नंतर ज्या चित्रपटाचा मी उल्लेख करणार आहे त्याची वेगळी ओळख सांगायची आवश्यकता नाही. आठवण करा एक काळोखी रात्र, भयान शांतता, सर्व गाव घाबरलेल्या अवस्थेत आणि दुरून कुठून तरी आवाज ऐकू येतो सुरुवातीला पैंजणांचा त्यानंतर एक काळे मांजर तिकडून तिकडे धावत जाते शेतातील पिके हलू लागतात आणि ऐकू येऊ लागते एक गाणे ज्याला ऐकताच लोक पटापट आपल्या आपल्या घरांमध्ये अक्षरशः पळून जातात दारे फटाफट लावली जातात. चित्रपटाचा नायक आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेले काही लोक त्या गाण्याचा आणि गाणारी चा शोध घ्यायला बाहेर पडतात आणि गाणे चालू राहते चालू राहते
ओ हो हो, ओ हो हो
कहीं दीप जले कहीं दिल
जरा देख ले जाकर परवाने
तेरी कौन सी है मंजिल।
चित्रपट के गाने पाहताना प्रेक्षक अक्षरशः जीव मुठीत धरून खुर्चीला घट्ट पकडून हे गाणे पहात असतात एवढ्या प्रचंड ताकतीने हे गाणे प्रस्तुत केले गेले आहे सर्व वातावरणच अतिशय गंभीर रहस्यमय आणि भीतीदायक आहे. यातल्या काही प्रसंगात तर प्रेक्षक अक्षरशः बसल्या जागेवर उडतात आणि खुर्च्यांचे फटाफट असे आवाज ऐकू येत असत इतका जिवंतपणा मला वाटते दुसऱ्या कुठल्याही भय चित्रपटात आढळून येत नाही. आपल्या लक्षात आलेच असेल मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलते आहे त्या चित्रपटाचे नाव होते
बीस साल बाद या चित्रपटात विश्वजीत आणि वहिदा रहमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या, असित सेन यांचे दिग्दर्शन होते शकील बदायुनी यांचे गीत आणि हेमंत कुमार यांचे संगीत होते. भयपट असून देखील त्यातील गाण्यांमुळे विशेषता या गाण्यामुळे आणि त्या चित्रपटाची कथा वातावरण या सर्वांमुळे हा चित्रपट भय चित्रपटांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आणि चाललेला चित्रपट आहे.
याच काळात आणखीन काही चित्रपट आले ते पूर्णतः भय चित्रपट नव्हते पण त्यातील काही प्रसंग असेच रहस्यमय आणि भय घेऊन आलेले होते. त्यातील ज्या चित्रपटाचा मी उल्लेख करीत आहे तो चित्रपट मीनाकुमारीच्या अतिशय सुंदर अभिनयाने सजलेला चित्रपट आहे. असे वाटते की हा चित्रपट मीनाकुमारींच्या जीवनावरच आधारलेला चित्रपट आहे चित्रपटाची कथा देखील साधारण तशीच आहे ज्यामध्ये या चित्रपटातील नायिका जिला बहुरानी म्हणून ओळखले जाते पती प्रेमाची भुकेली असते पण ते ज्या घरात सून म्हणून आलेली असते ते अत्यंत श्रीमंत जहागीरदाराचे घर असते त्या घरातले पुरुष स्वतःच्या बायकांपेक्षा नाचणाऱ्या बायका ंवर अधिक फिदा असतात. त्यामुळे मोठं घर रेशमी वस्त्र नोकर चाकर अलंकार हे सर्व मिळून सुद्धा या घरातील स्त्रिया कधीच सुखी राहू शकत नाहीत. सर्व काही आहे पण पतीचा सहवास त्याचे प्रेम मिळत नाही म्हणून त्या अतृप्त आणि दुःखी असतात. काही सूना परिस्थितीशी जुळवून घेतात पण मीनाकुमारी जी एका गरीब घरातून आलेली असते तिला या बाकी गोष्टी तुच्छ वाटतात तिला हवे असते पती प्रेम ज्याची ती भुकेली असते. ते प्रेम मिळण्यासाठी पतीला आवडणारी प्रत्येक गोष्ट ती करते पण तिचा पती पूर्णपणे तिच्याकडे दुर्लक्ष करतो. एका प्रसंगात मीना कुमारी व्याकुळ होऊन त्याला विचारते तुम्ही जिच्याकडे जाता तिच्यात असे काय विशेष आहे जे माझ्यामध्ये नाही तेव्हा तो उत्तर देतो ती माझ्याबरोबर दारू पिते तू पिणार आहेस का आणि मीनाकुमारी दारू प्यायला लागते त्या व्यसनामध्ये ती अक्षरशः बुडून जाते अधोगतीला लागते. तिची ही स्थिती त्या घरातील नोकर अर्थात गुलाम पहात असतो जो तिचा खूप आदर करतो तिच्या व्यक्तिमत्वाने तू खूप प्रभावीत असतो त्याला तिची ही स्थिती पहावत नाही पण मीनाकुमारी त्या स्थितीतून बाहेर पडत नाही. आणि व्हायचे तेच होते. ते संपूर्ण खानदान त्यांची ती हवेली पूर्णपणे बरबाद होते. हा गुलाम आता इंजिनियर झालेला असतो आणि त्याच्याकडे ती हवेली पाडण्याचे काम येते. तो तिथे येतो त्या पडलेल्या हवेलीकडे पाहून अतिशय दुःखी होतो त्याला आठवण येते बहुरानी ची आणि त्याच्या कानावर तिचे गाणे ऐकू येऊ लागते.
कोई दूर से आवाज दे चले आओ
चले आओ चले आओ चले आओ.
आपण ओळखलेच असेल मी कुठल्या चित्रपटाबद्दल बोलत आहे या चित्रपटाचे नाव होते साहेब बीबी और गुलाम. गुरुदत्त दिग्दर्शित या चित्रपटात मीनाकुमारी रहमान गुरुदत्त आणि वहिदा रहेमान यांच्या प्रमुख भूमिका आहे त. चित्रपटाचे संगीत हेमंत कुमार यांनी दिलेले आहे हे गाणे आपल्या अतिशय दर्द भरे आवाजात गीता दत्त यांनी गायलेले आहे. अतिशय उत्कृष्ट असा हा चित्रपट पाहिलाच पाहिजे खास करून मीनाकुमारीच्या अप्रतिम अदाकारीसाठी या चित्रपटाला चुकवू नये. या भूमिकेसाठी मीनाकुमारी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही प्राप्त आहे.
यानंतर एका मागे एक असे अत्यंत गाजलेले आणि लोकप्रिय झालेले भय चित्रपट आणि त्यातील अत्यंत लोकप्रिय झालेली भय गीते येत राहिली. त्यातील पहिला चित्रपट आहे वो कौन थी . या चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये आहेत मनोज कुमार साधना आणि हेलन. हा देखील एक भयपट होता अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट भयपट. मनोज कुमार डॉक्टर आहे आणि त्याला एका पावसाळी रात्री एका दूर असलेल्या निर्मनुष्य असलेल्या घरामधून फोन येतो की येथील तरुणी अतिशय आजारी आहे तिला पाहायला यावे. तो आपली गाडी घेऊन निघतो रस्त्यात एक सुंदर तरुणी पांढऱ्या साडीत उभी असलेली त्याला दिसते ती हात करून त्याला गाडी थांबवायला सांगते गाडीत बसते आणि त्याला रस्ता दाखवू लागते एका कब्रस्ताना जवळ ती गाडी थांबवण्यास सांगते आणि कब्रस्तानात निघून जाते अदृश्य होऊन जाते आणि तिच्या गाण्याचे बोल ऐकू येऊ लागतात
नैना बरसे रिमझिम रिमझिम
पिया तेरे आवन की आस
नैना बरसे रिमझिम रिमझिम
हे गाणे पुढे चित्रपटांमध्ये अनेक वेळा दाखविले गेले आहे जे या चित्रपटातील रहस्य आणि उत्सुकता वाढवत जाते.
यानंतर आला चित्रपट गुमनाम ज्यामध्ये मनोज कुमार नंदा हेलन प्राण मेहमूद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट देखील भयपट होता ज्यामध्ये सात लोक एका निर्मनुष्य बेटावर एका विचित्र योगायोगाने येऊन पोहोचतात आणि मग एका मागून एक त्यामध्ये लोकांची हत्या सुरू होते. त्या चित्रपटात सतत ऐकू येत राहते हे गीत जे कोण गात आहे का गात आहे हे कळत नाही. पण भय मात्र नक्कीच उत्पन्न करते ते गीत आहे
गुमनाम है कोई बदनाम है कोई, किसको खबर कौन है वह अंजना है कोई।
त्यानंतर आणखी एक चित्रपट विश्वजीत आणि वहिदा रहमान याच जोडीने अभिनेत केलेला हा भयपट होता कोहरा. विश्वजीत अत्यंत श्रीमंत तरुण ज्याची पहिली पत्नी जिवंत नसते तो गरीब घरातील मुलगी जी खूप सुंदर असते तिच्याबरोबर लग्न करून तिला घरी घेऊन येतो पण त्या मुलीला त्याच्या पहिल्या पत्नीचा आत्मा दिसू लागतो तिचे गाणे ऐकू येऊ लागते आणि तिची स्थिती अतिशय वाईट होऊन जाते. ते गाणे होते
झूम झूम ढलती रात झूम झूम ढलती रात।
हे गाणे देखील वारंवार चित्रपटात दाखविले गेले आहे ज्यामुळे एक रहस्यमय आणि भीतीदायक वातावरण निर्माण होते. गाण्याचे बोल आहेत शकील बदायुनी संगीत आहे हेमंत कुमार आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.
यानंतर आणखीन एक चित्रपट भय चित्रपट म्हणून आला होता जो फारसा चालला नाही या चित्रपटात चित्रा आणि जगदीप यांच्या प्रमुख भूमिका आहेत चित्रपटाचे नाव आहे नूर महाल. हाही भय चित्रपट होता. नायक एका सुनसान हवेली मध्ये आलेला आहे रात्रीची वेळ आहे तो एकटाच त्या हवेलीत घाबरलेला गोंधळलेला आहे आणि त्याला दिसते एका पांढऱ्या कपड्यांमध्ये एक सुंदर तरुणी जी हातात मेणबत्ती घेऊन गाणे गात फिरत आहे कधी दिसते कधी अदृश्य होते आणि हे गाणे देखील भीती आणि रहस्य याची निर्मिती करतात. चित्रपट जरी चालला नाही तरी हे गाणे मात्र खूप चालले लोकप्रिय झाले आणि खरेच ते गाणे खूप सुंदर आहे मधुर आहे लताजींच्या आवाजात आहे गाणे आहे
मेरे मेहबूब न जा आज की रात नजा
होने वाली है सहर थोड़ी देर और ठहर
मेरे महबूब ना जा आज की रात ना जा।
यानंतर ज्या चित्रपटाचे मी नाव घेणार आहे तो चित्रपट आहे नीलकमल राजकुमार वहिदा रहमान मनोज कुमार बलराज सहानी मेहमूद ललिता पवार अशा मोठमोठ्या कलाकारांनी सादर केलेला हा चित्रपट हे एक भयपट आहे असेच म्हणावे लागेल कारण यामध्ये नाईका आहे तिचा हा पुनर्जन्म आहे जे मागच्या जन्मात राजकुमारी होती तिच्यावर एका चित्रकाराचे प्रेम असते त्या चित्रकाराला या अपराधाबद्दल मृत्युदंड होतो परंतु मरता मरता देखील तो आपल्या प्रेमी केला आठवण करत राहतो तिच्यासाठी गाणे गात राहतो
पुढील जन्मात तेच गाणे तिला झोपेमध्ये ऐकू येऊ लागते आणि ती वी मनस्क अवस्थेत घरातून बाहेर पडते. ते गाणे होते
आजा आजा तुझको पुकारे तेरा प्यार
आजा मै तो खडा हू तेरी चाह मे आजा आजा.
मला वाटते माझा लेख बराच लांबला आहे आता काही भय चित्रपट आणि त्यातील गाण्यांचा फक्त उल्लेख करून मी पुढे जाते त्यातील पहिला चित्रपट आहे धुंद या चित्रपटात राजकुमार नवीन निश्चल आणि प्रिया राजवांशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि गाण्याचे बोल आहेत
संसार की हर शै का इतना ही फसाना है
एक धुंध से आए हैं एक धुंध में जाना है।
त्याचप्रमाणे कृष्णा कॉटेज या चित्रपटातील हे गाणे देखील खूप लोकप्रिय झाले होते ते देखील एक भयगीतच आहे आणि गीताचे बोल आहेत
बेपनाह प्यार है आजा
तेरा इंतजार है आजा।
त्यानंतर अतिशय गाजलेला चित्रपट नगीना प्रमुख भूमिकेत श्रीदेवी ऋषी कपूर आणि अमरीश पुरी. यामध्ये देखील सुरुवातीलाच एक भयगीत एका निर्मनुष्य हवेलीत नायकाला एक सुंदर तरुणी जाताना दिसते त्या गाण्याचे बोल होते
भूली बिसरी एक कहानी
फिर आई है एक याद पुरानी।
त्याचप्रमाणे माधुरी दीक्षित जॅकी श्रॉफ मुनमुन सेन आणि जावेद जाफरी अभिनेता चित्रपट हंड्रेड डेज हा चित्रपटही भय चित्रपट होता त्यामध्ये नायिकेला अचानक तिची अदृश्य झालेली बहीण गाताना दिसू लागते ते गाणे होते
आजा आजा तेरा प्यार खिंच लाया मुझे तेरा प्यार ।
आणि आता माझ्या लेखातील शेवटले गाणे हे गाणे मला स्वतःला देखील खूप आवडते कारण ते गाणे लिहिले आहे माझे आवडते गीतकार गुलजार यांनी संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर आवाज अर्थातच गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आणि चित्रपटाचे नाव आहे लेकिन.
विनोद खन्ना आणि डिंपल कापडिया यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट पूर्णतः रहस्यपट भयपट भूतपट आहे. या चित्रपटात नायिका एक एक भटकलेली आत्मा आहे तिला मुक्ती मिळत नाही कारण तिची एक इच्छा अपूर्ण राहिलेली आहे तिला ती पूर्ण करायची आहे म्हणून तिची आत्मा भटकत राहते तिला विनोद खन्ना जो पोलिस ऑफिसर आहे भेटतो त्याला ते दिसत राहते ती ती गात असते तो तिच्या मागे मागे जातो आणि ती एका इच्छित स्थळावर जाऊन थांबते आणि चित्रपटाचे रहस्य प्रकट होते आणि चित्रपट समाप्त होतो ते गाणे खूप लोकप्रिय आहे अवीट गोडीचे आहे बारंबार ऐकावे असे ते गाने
यारा सिली सिली ढोला सिली सिली बिरहा की रात का जलना
ओ यारा सिली सिली ढोला सिली सिली।
मित्रांनो आता येथे मी ७ थांबते मला माहित आहे की हा लेख बराच लांबला आहे पण वेळ देऊन जरूर हा लेख वाचा आणि आपल्याला हा लेख कसा वाटला त्याचा अभिप्रायही द्या मी आपल्या अभिप्रायाची वाट पाहिन.
साकव्यमीत शालोमित
