You are currently viewing आली या थंडीची लाट
Oplus_16908288

आली या थंडीची लाट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री प्रांजला धडफळे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आली या थंडीची लाट* 

 

आली या थंडीची लाट

गारठून गेली या वाट

धुंद या गारव्यात बाई

जाहला जीव पिसाट

 

गुलाबी भासती क्षण

मोहरुन गेलं हे मन

किनारी निवांतही त्या

धुंदला नदीचा काठ

आली या थंडीची लाट

 

मस्ताना मौसम भासे

फुलले ओठावर हासे

विसरून जगाचे भान

झालासे जीव झिंगाट

आली या थंडीची लाट

 

शहारले ते अंग

असता राजाच्या संग

अंतरी भावनांचं त्या

नगर ही आटपाट

आली या थंडीची लाट

 

प्रांजला धडफळे

प्रतिक्रिया व्यक्त करा