You are currently viewing लफडी पहात कित्येकांची

लफडी पहात कित्येकांची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लफडी पहात कित्येकांची*

[913]

 

पुळणीवरती अथांग पसरला

मंदिरे आहेत गुरूवर्यांची

बांधला किल्ला शिवबाने

आठवण येते अलिबागेची

//1//

*जनरल वैद्य* घडले तेथे

मासे पकडले कित्येकांनी

हल्ली उडवतो कुणी विमान

आरमार उभारले आंग्र्यांनी

//2//

कांदे टरबुजे आणि रताळी

शहाळी आणि केळी पिवळी

चोचले पुरवत अष्टागराचे

मासे धाडतो येथील कोळी

//3//

दत्त हिंगुळजा आणि कनकेश्वर

डोंगरी मंदिरे शान निराळी

अनंत जाती सुखे नांदती

सदैव असते येथे दिवाळी

//4//

आहे राजधानी रायगडची

फॅक्टरी काॅलेज ज्ञानाची

आहे शाळा विषेश मुलांची

चौपाटीवर वर्दळ सर्वांची

//5//

अजून वळतात पाय तिकडे

*धडे गिरवलेत वाळूत*

नाही विसरलो समुद्र लाटा

*बसून फिरलोय होडीत*

//6//

शर्यती पाहून बैलगाडीच्या

अजून होते मन *दु:खी*

नाही बघवत हाल त्यांचे

देवा ठेव तू त्यांना सुखी

//7//

वेद मंत्रांच्या ऋचा म्हणत

लाटा आहेत तरुण अजुन

धुळपाटीवर लिहीताना

चिंबोरीला पहातो अरुण दुरून

//8//

झाडे सुरूंची जख्ख म्हातारी

साक्षी आहेत प्रेमिकांची

कुजबुज ऐकून फितूर न झाली

*लग्ने पाहिली कित्येकांची*

//9//

साखर तरीची सैर भारी

करून येत मुले अक्षिची

आहे साक्षिला वेधशाळा

लफडी पहात कित्येकांची

//10//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

2311/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा