You are currently viewing श्रीमहाराजांच्या मना-शरीरा नसे विश्रांती

श्रीमहाराजांच्या मना-शरीरा नसे विश्रांती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वी. देशपांडे लिखित श्री गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

*काव्यपुष्प -१५*

श्रीमहाराजांच्या मना-शरीरा नसे विश्रांती
श्रीगुरूंच्या शोधात चालू हो त्यांची भ्रमंती
शोधात श्रीगुरूंच्या ते कलकत्त्याला आले
तिथे श्रीमहाराजांना श्रीरामकृष्ण भेटले ।।

श्रीगुरू शोधार्थची श्रीमहाराजांची फिरती
अजूनही अखंड सुरूच ती राहिली
वाटे त्यांना “आपला श्रीगुरु वेगळाच आहे
इतके फिरलो , तरी अजुनी ना गुरु भेटले ।।

श्रीसमर्थसंप्रदायी सत्पुरुष श्रीरामकृष्ण
महाराजांची भेट होता ते म्हणाले -बाळ,
येहळेगावच्या तुकारामचैत्यनाकडे जा
तुझे रे काम होईल…..।।

म्हणे कवी अरूणदास-आनंद मोठाच हा
श्रीगुरुभेट वर्णन लिहिण्याचे भाग्य लाभले ।।
—————————————-
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342

प्रतिक्रिया व्यक्त करा