You are currently viewing माझे मलाच कळेना

माझे मलाच कळेना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*माझे मलाच कळेना*

काय आणि कसे सांगू
माझे मलाच कळेना,
तु माझाच असूनही
मलाच तु मिळेना..।

तुझ्या आठवणी
मनात मी जपते,
विरहाच्या असंख्य
वेदनांत मी तपते..।

तुला भेटण्याची
नेहमी आस धरते,
केव्हा भेटशील
मन माझे झुरते..।

आसुसलेले मन
तुझ्या मिठीसाठी,
केव्हा होईल अपुल्या
प्रेमळ भेटीगाठी..।

तु दूर असूनही
जवळ मला भासतो,
जसे चांदणीचा चंद्र
तसे माझ्या तू असतो..।

 

✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा