You are currently viewing जिल्हयाच्या विकासाची दूरदृष्टी असलेल्या नारायण राणे यांना विजयी करा – मंगेश तळवणेकर

जिल्हयाच्या विकासाची दूरदृष्टी असलेल्या नारायण राणे यांना विजयी करा – मंगेश तळवणेकर

जिल्हयाच्या विकासाची दूरदृष्टी असलेल्या नारायण राणे यांना विजयी करा – मंगेश तळवणेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोरगरीब जनतेला १९९० पासून आजतागायत मदत करणारे नारायण राणे पहिले राजकारणी*

सावंतवाडी

नारायणराव राणें यांनी प्रथम निवडून आल्यापासून कोकणातील गोरगरीब जनतेला वेळोवेळी मदत केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषीत करुन घेतला, कोकणातील पर्यटन स्थळांचा विकास, रस्त्यांचे रुंदीकरण, नळ योजना सुरु केल्या. ज्यावेळी शासकीय योजनांचा लाभ येथील लोकांना मिळत नव्हता, त्यावेळी कोकणातील गोरगरीबांना गरजूंना, आजारी व्यक्तींना नारायणराव राणे यांनी भरपुर आथिर्क मदत दिली हे मी सर्व जवळून पाहिलेले आहे. नारायणराव राणे सारखा दुसरा दुरदृष्टी असलेला अभ्यासू नेता पुन्हा जिल्ह्यात होणे कठीण आहे म्हणून या निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केले आहे.
पुर्वी एका विधानसभा मतदार संघापुरते मतदान करण्यास मतदारांना मिळत होते. जिल्ह्यातील प्रत्येक गावात .नारायणराव राणे यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठे केलेले आहे. आता त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील लोकांना समजावून सांगून नारायणराव राणे यांना लोकसभेत विजयी होण्यासाठी भरघोस मते मिळवून देणे त्यांचे कर्तव्य आहे आणि हीच ती वेळ! जिल्ह्याच्या विकासासाठी नारायणराव राणे यांना विजयी करणे अत्यावश्यक आहे ,असे मंगेश तळवणेकर यांनी म्हटले आहे.
विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने नारायणराव राणेंना जाहीर पाठींबा देण्यात आला, त्यावेळी मंगेश तळवणेकर, लक्ष्मण देऊळकर, प्रकाश सावंत, नारायण कारिवडेकर, अजय सावंत, श्री हरमलकर, भालचंद्र राऊळ, सुधीर नाईक, प्रकाश जाधव, सागर सावंत, भरत गंगावणे, बाळकृष्ण नाईक, संतोष नाईक आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा