You are currently viewing दोडामार्ग भेडशी वरचा बाजार येथे खून

दोडामार्ग भेडशी वरचा बाजार येथे खून

दोडामार्ग भेडशी वरचा बाजार येथे खून

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी वरचा बाजार येथे एकाचा खुन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर व्यक्ती यापूर्वी एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. त्यानंतर आता बाजारपेठेत मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करत असल्याचे समजते. सदर व्यक्ती मनमिळाऊ स्वभावाचे होता. त्याला दारूचे व्यसन होते.
घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील प्रकाश महादेव देसाई यांनी दोडामार्ग पोलिसांना दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

 

मयताच्या मानेच्या मागच्या बाजूला एखाद्या वस्तूने वार केल्याच्या खुना आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. सदर व्यक्ती ने दारूचा नशेत प्रकार घडला असल्याचे सूत्रांकडून समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा