You are currently viewing देशातील २५ लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली त्यातील कोकणात १ लाख २५ हेक्टर…

देशातील २५ लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली त्यातील कोकणात १ लाख २५ हेक्टर…

देशातील २५ लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली त्यातील कोकणात १ लाख २५ हेक्टर…

डॉ शिनगारे:रोटरी क्लब मँगो सिटी देवगड व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वतीने केले होते आंबा चर्चा सत्राचे आयोजन..

देवगड

देशात २५ लाख हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड असून त्यामध्ये कोकणात १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड आहे. राज्यातील आंबा लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोकणात आंबा लागवडीसाठी व्यापले आहे. मागील काही वर्षात आंबा उत्पादनावर खूप परिणाम झाला आहे. त्याला एकमेव कारण म्हणजे बदलते हवामान आहे. मोठ्या प्रमाणात वाढते तापमान, बदललेला पाऊस पडण्याचा हंगाम आणि वर्षभर पडणारा पाऊस थंडीच्या प्रमाणात होणारे चढ-उतार यामुळे आंबा हंगाम लांबणीवर जात आहे. त्यातच आंबा पिकांवर कीटकनाशकांचा प्रादुर्भाव जास्त होत असल्याने फळमाशीचा प्रादुर्भाव मागील काही वर्षांपासून खूपच वाढला आहे. फळमाशी वर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्षक सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात माशीला आकर्षित करण्यासाठी जे औषध आहे ते बागातदारांनी दर्जेदार घेतले पाहिजे. सर्व बागायतदारांनी दर्जेदार औषध सापळ्यात ठेवले तर फळ माशीवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे .असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ प्रकाश शिनगारे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आंबा बागायतदारांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रकाश शिनगारे, संशोधन संचालक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुरेंद्र पतंगे (सहयोगी अधिष्ठाता काढणी पश्चात व्यवस्थापन महाविद्यालय रोहा) डॉ केतन चौधरी( विस्तार शिक्षण विभाग प्रमुख) डॉ सुरेश नाईक, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट प्रवीण पोकळे सचिव विजय डांबरी विजय बांदिवडेकर, नरेश डामरी, तालुका कृषी अधिकारी प्रदीप खाडे, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा