You are currently viewing आंबोली घाटातील धबधब्याना सिनेमाची नावे देण्यास ग्रामस्थांचा विरोध…

आंबोली घाटातील धबधब्याना सिनेमाची नावे देण्यास ग्रामस्थांचा विरोध…

आंबोली

आंबोली घाटातील धबधब्याना सिनेमातील नावे देण्याचा वात्रटपणा करू नका आंबोलीतून याबाबत रोष व्यक्त करण्यात येत असून तेथे होणाऱ्या उदघाटन वेळी मंत्री दीपक केसरकर याना देखील हे सांगण्यात येणार आहे.

आंबोली घाट म्हणून प्रसिद्ध आहे. या घाटात अनेक धबधबे आहेत.जवळपास ६ धबधबे मोठे आहेत तर आणखी असंख्य धबधबे आहेत.सध्या जो बाहुबली हा सिनेमाच्या नावाने जो कोणी सुरसुरे सोडले आहे त्याच्यापेक्षा मोठा धबधबा दरड पडली त्याच्या बाजूला आहे त्या ठिकाणी जागा पण जास्त असून थेट कोसळणारा धबधबा तो मोठा आहे पण तेथे जाता येत नाही. आज ज्या धबधब्याचे उदघाटन आहे खर कर हा रस्त्याच्या बाजूला असणारा धबधबा आहे याचे अचानक उदघाटन करण्याची गरज नाय होती.नेहमी प्रमाणे सगळ्याच धबधब्याकडे गर्दी असते.इथेही असते मग उदघाटन करण्याची गरज काय असा सवाल उपस्थित होत आहे. घाटात प्रत्येक धबधब्याला कोणतरी वेगवेगळी वाटेल ती नावे देत जातील.त्यामुळे आंबोली घाटातील धबधब्याना नावे देण्याची गरज नाही त्या नावाला विरोध आहे.थोड्याच वेळात त्याचे उदघाटन असेल तेव्हा दीपक केसरकराना देखील हे सांगण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.यावेळी प्रमुख गावकरी शशीकांत गावडे,शिवसेना (शिंदे गट)उपसंघटक विशाल बांदेकर,सदस्य महेश पावसकर,काशीराम राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे,संतोष पालेकर आदी ग्रामस्थानी याबाबत विरोध दर्शविला आहे.ग्रामपंचायत मध्ये देखील तसा ठराव घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 20 =