You are currently viewing सध्याच्या आभासी जगात फेसबुक, इन्सटाग्राम या सारख्या सोशल मिडीया चा वापर करतांना प्रत्यक्ष सत्य काय आहे हे पडताळा सर्वांनी सायबर सेक्युअर होणे गरजेचे

सध्याच्या आभासी जगात फेसबुक, इन्सटाग्राम या सारख्या सोशल मिडीया चा वापर करतांना प्रत्यक्ष सत्य काय आहे हे पडताळा सर्वांनी सायबर सेक्युअर होणे गरजेचे

– ॲड.दिपक मालटकर सेक्रेटरी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण सिंधुदूर्ग

आज दि. 22 सप्टेंबर रोजी माता वैष्णोदेवी महाविद्यालय ओसरगांव, ता.कणकवली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदूर्ग यांचे वतीने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम अंतर्गत ॲड.दिपक मालटकर सेक्रेटर जिल्हा विधी सेवा प्राधीकरण सिंधुदूर्ग यांनी युवकांशी संवाद साधला.या वेळी .कायदे विषयक बौध्दीक संपदा संरक्षीत व विचार सवर्धीत करण्याचा एकमेव प्रभावी मार्ग आहे असे सांगीतले.

ॲसिड हल्ला आणि कायदेशीर बाजू तसेच सायबर क्राईम, भारतीय करार कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, अन्नसुरक्षा कायदा, रेरा कायदा, ग्राहक संरक्षण कायदा असे महत्वाचे कायदे थोडक्यात व सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगीतले. या विषयासंबंधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडून गेलेल्या व वर्तमान घटनांविषयी व त्यासंबंधी असणारे कायदे, परीषदा, घडामोडी या सगळयांवर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

या विषयासंदर्भात महाविद्यालयातील युवक-युवतीमध्ये तसेच समाजामध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत मांडताना या विषयासंदर्भात असणारे दुर्लक्ष व अज्ञान आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची झालेली अमाप हानी यावर भाष्यकेले.

सर्व सामान्य जनतेला जिल्हा विधी सेवा प्राधीकरण च्या कामकाजा बाबत माहीती व्हावी. सर्वांमध्ये जनजागृती व्हावी या उददषाने सवीस्तर माहीती दीली. यात समजा आर्थीक परीस्थीती नसलेल्या एखाद्या व्यक्तीला वकील हवा असेल तर अगदी तालुका कोर्ट ते सुप्रीम कोर्ट पर्यंन्त काही अटीशर्थी नुसार मोफत वकील दिले जातात. केंद्रशासनाच्या कायदेविषय मोबाईल ॲपच्या माध्यमातून मोफत कायदेशीर सल्ला देणे, लोकांपर्यन्त सर्व कायद्यांची माहीती पोहचवीणे जनजागृती करणे अशी सर्व कामे केली जातात.दिव्यांग व्यतींना विविध सरकारी कार्यालयातील कामे जर कायदेशीर बाबीमुळे अपूर्ण असतील तर अशी कामे पूर्ण करण्यासाठी कायदेशीर मदत केली जाते. थोडक्यात शासन आणी गरजू व्यक्ती यांच्यातील ब्रिज म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधीकरण काम करते.

सायबर कायदा पोक्सो कायदा याबाबतीत मार्गदर्शन करतांना विविध खटल्यांचा, घटनांचा संदर्भ त्यांनी दिला.

आधुनिक काळात सर्वजण मोबाईल आणि सोशलमिडीयाचा वापर करतात मात्र याच गोष्टी मुळे अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. प्रामुख्याने फेसबुक, इन्साटाग्राम सारख्या गोष्टींचा वापर करतांना प्रोफाईल वरील माहीती आणी प्रत्यक्ष माहीती याबाबतीत तफावत असते. प्रोफाईल वरील माहीती आणि फोटोंमुळे अनेक युवक युवती फसले जातात. त्यामुळे सध्याच्या आभासी जगात फेसबुक, इन्सटाग्राम या सारख्या सोशल मिडीया चा वापर करतांना प्रत्यक्ष सत्य काय आहे हे पडताळा सर्वांनी सायबर सेक्युअर होणे गरजेचे असे मत ॲड.दिपक मालटकर यांनी मांडले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे ॲड.दिपक मालटकर यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रकल्पअधीकारी श्री.संतोष सावंत हे देखील उपस्थीत होते त्यांचे स्वागत हॉटेलमॅनेजमेट विभाग प्रमुख प्रा. प्रथमेश ठाकूर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकवर्ग व कर्मचारी उपस्थती होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा