You are currently viewing सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईच्या अध्यक्षपदी हरिष परब यांची निवड

सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईच्या अध्यक्षपदी हरिष परब यांची निवड

सिंधुदुर्ग :

मुंबईस्थित “सिंधुदुर्ग सहकारी बँकेच्या”सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीसाठी निवडणूक प्रकिया बिनविरोध पूर्ण झाली असून अध्यक्षपदी देवगड मुटाट येथील श्री. हरिष बाळकृष्ण परब यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष श्री. जयवंत श्रीधर नरसाळे, संचालक श्री. दिवाकर रामचंद्र दळवी (सावंतवाडी), श्री. दिनकर हिरोजी तावडे (देवगड), तज्ञ संचालक श्री. शरदचंद्र सदानंद देसाई (सावंतवाडी), संचालक श्री. विलास जर्नादन परब (कुडाळ),श्री.श्रीकृष्ण दत्ताराम परब ( मसुरे -मालवण), श्री. चंद्रप्रकाश भैरुलाल जैन(मुंबई), श्री. संभाजी शिवाजी मंडले ( सांगली), श्री. विजय बुधाजी नाईक(देवगड),श्री. स्वप्निक सुभाष फाटक(देवगड), श्रीमती प्रतिक्षा प्रमोद परब(कणकवली), सौ. पल्लवी अक्षय पंडित(मुंबई), तज्ञ संचालक (स्विकृत), श्री. मोहन भास्कर तळेकर (देवगड), मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल वसंत प्रभुदेसाई, सरव्यवस्थापक श्री. सिताराम धुराजी धुरी(कुडाळ) यांंची निवड करण्यात आली.

 

सिंधुदुर्ग सहकारी बँकेच्या लालबाग व बदलापूर येथे दोन शाखा आहेत. आपल्या जिल्हयाची एकमेव बँक मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. बँकेला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटिबद्ध आहोत. जिल्हयातील तमाम बांधवांनी आपल्या बॅकेकरिता भागभांडवल ठेवी, कर्ज, नवीन खाती वाढविण्यासाठी सहकार्य करावे.तसेच बँकेची नवीन शाखा सिंधुदुर्ग जिल्हयात उघडण्याचा संचालक मंडळाचा मनोदय असून त्यादृष्टीने लवकरच पाठ पुरावा करण्यात येईल अशी माहिती बँकेचे नवनिर्वाचित संचालक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक दत्ताराम परब यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा